इंधनदरवाढीचा भडका; कझाकिस्तानमध्ये अध्यक्षांचे घरचं पेटवले...

kazakhstan protest : पंतप्रधान अस्कार मामिन यांनी राजीनामा दिला आहे.
kazakhstan protest

kazakhstan protest

Sarkarnama

Published on
Updated on

कधीकाळी सोव्हिएत युनियनचा भाग असलेला आणि आता आपले स्वतंत्र अस्तित्व जोपासत असलेल्या काझाकिस्तानमध्ये इंधन दरवाढीमुळे अराजकता (kazakhstan protest) माजली आहे. या दरवाढीविरोधात जनता रस्त्यावर उतरली असून रागाच्या भरात नागरिकांनी देशाच्या अध्यक्षांचे घर पेटवून दिले आहे. कझाकिस्तानाची आर्थिक राजधानी आणि सर्वात मोठे शहर असलेल्या अल्‍माटीमध्ये काही आंदोलकांवर पोलिसांनी गोळीबार केल्याचेही समोर आले आहे. या सगळ्या परिस्थितीमुळे देशात आणीबाणी लागी करण्यात आली असून स्थानिक सरकार कोसळले आहे. पंतप्रधान अस्कार मामिन यांनी राजीनामा दिला आहे.

इंधनाच्या उत्पादनावर अवलंबून असणाऱ्या कझाकिस्तानमध्ये 'एलपीजी'च्या दरावर सरकारचे नियंत्रण होते. यामुळे 'एलपीजी' अतिशय अल्प दरामध्ये नागरिकांना उपलब्ध होत असायचे. अनेक नागरिकांनी त्यांच्या कार 'एलपीजी'वर करून घेतल्या होत्या. मात्र, नव्या वर्षापासून सरकारने अचानक इंधन दरावरील नियंत्रण मागे घेत असल्याची घोषणा केली. परिणामी आता 'एलपीजी'चे दर दुप्पट झाले आहेत. सरकारच्या या निर्णयानंतर रविवारपासून संपुर्ण देशात आंदोलनांचा भडका उडाला आहे.

<div class="paragraphs"><p>kazakhstan protest </p></div>
ठरलं! निवडणूक आयोग करणार मोठी घोषणा; आज मॅरेथॉन बैठकांचे सत्र

कोरोनामुळे आधीच आर्थिक अडचणींचा सामना कराव्या लागत असलेल्या नागरिकांना इंधनाच्या दरात वाढ झाल्यानंतर संतापात आणखी वाढ झाली. त्यानंतर मंग्यताऊ या प्रांतापासून आंदोलनाला सुरुवात झाली. हळू हळू देशाच्या इतर भागात या आंदोलनाचे लोण पसरत गेले. नूर अल सुल्तानसह सर्वांत मोठ्या अल्माटी आणि अन्य शहरांमध्ये आंदोलकांनी जाळपोळीला सुरुवात केली. या सगळ्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा आणि थंड पाण्याचा वापर करून, आंदोलकांवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. शिवाय अल्माटीमध्ये काही आंदोलकांवर पोलिसांनी गोळीबार केला असल्याचेही समोर आले आहे.

<div class="paragraphs"><p>kazakhstan protest </p></div>
काँग्रेसला धक्का; दोन महिन्यांपूर्वीच शिवसेनेतून आलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम

या दरम्यान अल्‍माटीमध्ये काही आंदोलकांनी राष्ट्रपती आणि महापौरांच्या घराची तोडफोड केली. शिवाय रागाच्या भरात राष्ट्रपतींचे घर पेटवून देण्यात आले. लोकांचा राग शांत करण्यासाठी सरकारने इंधानाचे भाव पुर्ववत करण्याची घोषणा केली असून ते पुर्वीपेक्षा कमी असतील याची हमी दिली आहे. मात्र त्यानंतर देखील आंदोलक आक्रमक आहेत. शेवटी देशाचे अध्यक्ष कॅसिम-जोमार्ट तोकायेव यांनी मंत्रिमंडळ बरखास्त केले असून काळजीवाहू पंतप्रधान म्हणून समायलोव अलीखान यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवाय अध्यक्षांनी रशियाकडे देखील मदत मागितली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com