I.N.D.I.A. Alliance on Union Budget : 'अर्थसंकल्पात राज्यांचे अधिकार मारले गेले' ; I.N.D.I.A. आघाडीचा आरोप संसदेत आंदोलनही करणार!

I.N.D.I.A. Alliance Meeting News : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी आज सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक पार पडली; नीति आयोगाच्या बैठकीवरही बहिष्कार टाकण्याची घेतली आहे भूमिका!
I.N.D.I.A. Alliance
I.N.D.I.A. AllianceSarkarnama
Published on
Updated on

Union Budget 2024 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प सादर केला. एकूण 48 लाख 20 हजार 512 कोटी रुपयांचा हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे.

समाजातील प्रत्येक घटकाला बळ देणारा, देशातील ग्रामीण भाग, गरीब अन् शेतकऱ्यांना समृद्धीच्या मार्गावर नेणारा हा अर्थसंकल्प आहे. असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे. तर हा अर्थसंकल्प म्हणजे काँग्रेसच्या जाहीरनाम्याची कॉपी असल्याचं राहुल गांधी म्हणाले आहेत.

एकूणच अर्थसंकल्पावर उलटसुलट प्रतिक्रिया समोर येत आहेत. विरोधकांच्या इंडिया आघाडीने या अर्थसंकल्पाला भेदभावपूर्ण असे संबोधले आहे. तसेच, बुधवारी इंडिया आघाडीकडून संसदेत विरोध प्रदर्शनही केले जाणार आहे. विरोधकांच्या इंडिया आघाडीने आरोप केला आहे की, केंद्रीय अर्थसंकल्पात राज्यांचे हक्क मारले गेले आणि त्यांच्यासोबत भेदभाव झाला आहे.

I.N.D.I.A. Alliance
PM Modi on Union Budget 2024 : तिसऱ्या कार्यकाळातील पहिल्याच अर्थसंकल्पावर पंतप्रधान मोदींची विशेष प्रतिक्रिया, म्हणाले...

मंगळवारी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे(Mallikarjun Kharge) यांच्या निवासस्थानी विरोधी पक्षांची बैठक झाली, यावेळी सर्वच विरोधी पक्षाच्या नेत्यांची उपस्थिती होती. यामध्ये राहुल गांधी, शरद पवार, जयराम रमेश, प्रमोद तिवारी, संजय सिंह, डेरेक ओ ब्रायन, कल्याण बॅनर्जी, टी आर बालू, तिरुचि शिवा, संजय राऊत, संतोष कुमार, हनुमान बेनीवाल, मोहम्मद बसीर यांच्यासंह अनेक नेत्यांचा समावेश होता. मात्र या बैठकीत समाजवादी पार्टीचा कोणताही नेता दिसला नाही.

केंद्रीय अर्थसंकल्पावर नाराज विरोधी पक्षांचे मुख्यमंत्री नीति आयोगाच्या बैठकीवर बहिष्कार टाकू शकतात. ही बैठक 27 जुलै रोजी होणार आहे. इंडिया आघाडीच्या आज झालेल्या बैठकीत यासंदर्भात चर्चा झाली, ज्यामध्ये जास्तकरून नीति आय़ोगाच्या बैठकीवर बहिष्कार टाकण्याचा सूर निघाला. मात्र ममता बॅनर्जी तर याच बैठकीसाठी 26 जुलै रोजीच दिल्लीत दाखल होणार आहेत.

I.N.D.I.A. Alliance
Budget 2024 For Defence : संरक्षण बजेट 68 हजार कोटींनी वाढले ; सीमा सुरक्षा-देशांतर्गत उत्पादनांवर भर!

तामिळाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन(MK Stalin) यांनी म्हटले आहे की, केंद्रीय अर्थसंकल्पात तामिळनाडूच्या उपेक्षेबद्द ते 27 जुलै रोजी नीति आयोगाच्या बैठकीवर बहिष्कार टाकतील. स्टॅलिन यांनी म्हटले आहे की, या बैठकीवर बहिष्कार घालणंच योग्य आहे. कारण केंद्राने तामिळनाडूकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. आम्ही जनतेच्या न्यायालयात लढा सुरूच ठेवू. द्रमुक खासदार अर्थसंकल्पाच्याविरोधात बुधवारी दिल्लीत विरोध प्रदर्शन करणार आहेत.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com