Atique Ahmad News : अतिकच्या आयुष्याची चित्तरकथा..; वडील टांगा चालवायचे, मुलाने १७ व्या वर्षी केला पहिला खून ; महागड्या मोटारी..

Story of Mafia Atique Ahmad : टांगेवाल्याचा मुलगा, उत्तरप्रदेशातील माफीया.., आमदार- खासदार असा त्याचा प्रवास.
Atique Ahmed news:
Atique Ahmed news:Sarkarnama

Story of Mafia Atique Ahmad : प्रयागराजमध्ये काल (शनिवारी) माफिया अतिक आणि त्याचा भाऊ अश्रफची तीन जणांनी हत्या केली. हल्लेखोरांनी पोलिसांची सुरक्षा यंत्रणा तोडून आतिकच्या डोक्यात गोळी झाडली. यानंतर अश्रफवर गोळीबार केला आणि दोघांचा जागीच मृत्यू झाला.याप्रकरणी तीन जणांना अटक केली आहे.

महागड्या मोटारी..

टांगेवाल्याचा मुलगा, उत्तरप्रदेशातील माफीया.., आमदार- खासदार असा त्याचा प्रवास अखेर काल संपला. अतिकच्या जीवनशैलीविषयी विविध माहिती समोर येत आहे. त्याच्याकडे अनेक महागड्या मोटारी होत्या.

विविध मोटारी आपल्या ताफ्यात असाव्यात असे त्याला वाटायचे. लैंड क्रूजर, मर्सिडीज सारख्या एसयूवी कार त्याच्याकडे होत्या. त्यापैकी हमर कार (Hummer Car) ही खूप चर्चेत होती.

Atique Ahmed news:
Anna Hazare reacts arvind kejriwal :..तर केजरीवालांना शिक्षा झालीच पाहिजे ; अण्णा हजारेंचा घणाघात

786 क्रमांक्राची कार

२०१७ च्या विधानसभा निवडणुकीत 786 क्रमांक्राची ही कार चर्चेत आली होती. जगातील महागड्या मोटारी त्यांच्या ताफ्यात होत्या. खूपवेळा तो स्वतः या मोटारी चालवित असे. त्यांच्या नावावर फक्त पाच मोटारी होत्या. अन्य त्यांच्या कुटुंबियांच्या नावावर होत्या.

दहावी नापास मुलगा..

१० आँगस्ट १९६२ रोजी प्रयागराज येथे त्याचा जन्म झाला होता. त्याचे वडील फिरोज अहमद हे शहरात टांगा चालवून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करीत असायचे. दहावी नापास असलेल्या अतिक लहानपणीच गुन्हेगारांच्या संपर्कात आला. लवकर श्रीमंत होण्यासाठी त्यांनी लूटणार करणे, अपहरण करणे अशा प्रकारचे गुन्हे करण्यास सुरवात केली.

Atique Ahmed news:
Andhra Pradesh News : ऐकावं तर नवलचं ; मुख्यमंत्र्यांचं बॅनर फाडणाऱ्या कुत्र्याविरोधात गुन्हा ; सहा कोटी जनतेचा अपमान..

पाच वेळा आमदार, एक वेळा खासदार

वयाच्या १७ व्या वर्षी त्याने पहिला खून केला. त्यानंतर त्याच्या गुन्हेगारीचा आलेख उंचावतच गेला. १९८९ मध्ये त्याने राजकारणात प्रवेश केला. अलाहाबाद पश्चिममधून तो आमदार म्हणून निवडून आला त्यानंतर तो पाच वेळा आमदार, एक वेळा खासदार झाला. २०१७ पासून तो जेलमध्ये होता. त्यांच्यावर ५० पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत.

त्यांच्यावर हल्ला करणाऱ्या तिघांचीही पोलीस कोठडीत चौकशी सुरू आहे. त्यांच्याकडून शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत. या हल्ल्यात कॉन्स्टेबल मानसिंग यांनाही गोळी लागली असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Atique Ahmed news:
NCP News : मोठी बातमी : भाजपचे पाच आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात ; प्रदेशाध्यक्षांचा दावा

हल्लेखोर मीडियाकर्मी म्हणून आले होते. लवलेश तिवारी, सनी आणि अरुण मौर्य अशी त्यांची नावे आहेत. हल्ल्यानंतर तिघांनीही आत्मसमर्पण केले. लवलेश बांदा, अरुण हमीरपूर आणि सनी कासगंज येथील रहिवासी आहे. अतिकची हत्या झाल्यानंतर त्याच्याविषयीची माहिती माध्यमांवर येत आहे.

त्यांचे टीव्ही केबल कनेक्शन तोडले..

अतिकच्या मृत्यूची बातमी समजताच प्रयागराज तुरुंगात बंद असलेला अतिकचा दुसरा मुलगा अली बेशुद्ध पडला. अतीकची दोन अल्पवयीन मुले, ऐजम आणि आबान हे राजरूपपूर बालगृहात आहेत. त्यांचे टीव्ही केबल कनेक्शन तोडण्यात आले आहे.

(Edited By Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com