Politician Actors News: बॉलिवूड अभिनेता सनी देओलचा 'गदर २' हा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर देशभरात त्याची चर्चा होत आहे. 'गदर २' सिनेमाला मोठे यश मिळत असताना भाजपचा खासदार असलेल्या सनी देओलने लोकसभेच्या रणांगणातून माघार घेत २०२४ ची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. सनी देओलचा हा निर्णय भाजपसाठी धक्का मानला जात आहे. (Latest Marathi News)
दुसरीकडे सनी देओलच्या मुंबईतल्या 'सनी व्हिला' या त्याच्या बंगल्याच्या लिलावाची चर्चा रंगली होती. मात्र बँक ऑफ बडोदाने एक नोटीस काढून हा लिलाव रद्दही केला आहे. त्यामुळे काँग्रेसकडून काही आरोप करीत खासदार सनी देओलवर टीका केल्याने त्यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली असावी, अशी चर्चा रंगली आहे.
गदर २ हा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर देशभरात अभिनेता सनी देओलची चर्चा आहे. या सिनेमाला प्रचंड यश मिळालं आहे. या सिनेमांनी चारशे कोटीपेंक्षा अधिक कमाई केली आहे. त्यामुळे गदर २ च्या यशामुळे चांगलाच चर्चेत आलेल्या सनी याने अशा प्रकारचा निर्णय घेतल्याने, हा भाजपला धक्का मानला जात आहे.
खासदार म्हणून निवडून आल्यापासून लोकसभेत सनी देओल यांनी फक्त १९ टक्के उपस्थिती लावली, असे विरोधकांकडून आरोप केले जात होते. माझ्या राजकीय कारकिर्दीवर जर आरोप केले जात असतील तर ते सहन होत नाहीत, असे सांगत आगामी काळात होणारी लोकसभा निवडणूक लढणार नसल्याचे सांगत, अभिनेता सनी देओलने निवडणूक रिंगणातून माघार घेतली आहे.
संसदेत देश चालवणारे लोक बसले आहेत. मात्र त्यांची वागणूक तुम्ही पाहिली का ? मला हे वाटतं की मी असा नाही. मी एक विचार घेऊन राजकारणात आलो होतो. मात्र आता माझ्या लक्षात आलं आहे की, मी जे काही काम करतो आहे, ते एक अभिनेता म्हणूनही करु शकतो. माझ्यासाठी एकाचवेळी अनेक कामं करणं अशक्य आहे. त्यामुळे २०२४ ची लोकसभा निवडणूक मी लढवणार नाही, असे सनी देओलने म्हटले आहे.
रविवारी बँक ऑफ बडोदाने सनी देओलने घेतलेल्या कर्जाची परतफेड न केल्याने जुहू येथील सनी व्हिला बंगल्याच्या लिलावासाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्याच्यावर ५६ कोटी रुपयांची थकबाकी होती. त्याच्या वसुलीसाठी २५ सप्टेंबरला सनी व्हिलाचा लिलाव करण्यात येणार होता. यासाठी ५१ कोटी ४३ लाख रुपयांची बोली लावण्यात आली होती. मात्र, सोमवारी बँकेकडून एक पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. या पत्रकानुसार हा लिलाव तांत्रिक कारणामुळे रद्द करण्यात आला आहे.
सनी देओलच्या मुंबईतल्या सनी व्हिला या बंगल्याचा लिलाव करण्याची नोटीस जारी केली होती. मात्र, सोमवारी ही नोटीस मागे घेण्यात आली आणि लिलाव रद्द करण्यात आला. एक दिवसात नोटीस मागे कशी घेण्यात आली? यावर काँग्रेसने प्रश्न उपस्थित केला होता.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.