नवी दिल्ली : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी गुरूवारी बहूमत सिध्द करण्याचे आदेश महाविकास आघाडी सरकारला (MahaVikas Aghadi) दिले आहेत. त्याविरोधात शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) धाव घेतली आहे. त्यांच्या अर्जावर न्यायालयात सकाळी सुनावणी झाली. प्रभू यांच्या बाजूने अभिषेक मनू सिंघवी यांच्या युक्तीवादानंतर न्यायालयाने सायंकाळी पाच वाजता दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेण्यास तयारी दर्शवली. त्यामुळे आघाडी सरकारला काहीसा दिलासा मिळाला आहे. (Maharashtra Political Crisis)
शिवसेनेच्या याचिकेवर सुनावणीला सुरूवात झाल्यानंतर अभिषेक मनू सिंघवी यांनी आजच यावर निर्णय़ घेणे आवश्यक असल्याची मागणी केली. अपात्रतेची कारवाई प्रलंबित असलेल्या आमदारांसह बहूमत चाचणी झाल्यास ती बेकायदेशीर ठरेल. हे प्रकरण आजच ऐकून घेतले नाही तर त्याला काहीच अर्थ उरणार नाही. आज सकाळी चाचणीबाबत नोटीस मिळाली. त्यामुळे या प्रकरणावर आज संध्याकाळीच सुनावणी व्हावी. दुपारी चार वाजेपर्यंत आम्ही आवश्यक कागदपत्रं सादर करू, असं सिंघवी यांनी न्यायालयात सांगितलं.
त्यानंतर न्यायमूर्ती कांत यांनी आपण त्याबाबतची कागदपत्रे दिल्याशिवाय माहिती कशी होणार, असा सवाल केला. त्यावर सिंघवी यांनी सायंकाळपर्यंत सर्व कागदपत्रे दिली जातील, सायंकाळी सहा वाजता सुनावणी घ्यावी, अशी विनंती केली.
एकनाथ शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांनी लगेच त्यावर आक्षेप घेतला. बहूमत चाचणीचा आदेश देणं हा राज्यपालांचा अधिकार आहे. अपात्रतेचे प्रस्ताव प्रलंबित असणे आणि बहूमत चाचणीचा काहीही संबंध नसल्याचेही कौल यांनी सांगितले. आज संध्याकाळी सुनावणी घेणं योग्य ठरणार नाही, असं सांगत कौल यांनी सुनावणी टाळण्यासाठी प्रयत्न केले.
त्यानंतर न्यायमूर्ती कांत यांनी सिंघवी यांनी म्हणणे मान्य करत दुपारी तीन वाजता सर्व कागदपत्रे सादर करण्याचे आदेश दिले. तसेच सायंकाळी पाच वाजता त्यावर दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेऊ, असंही स्पष्ट केलं. त्यामुळे आघाडीला काहीसा दिलासा मिळाला आहे. न्यायालयाकडून बहूमत चाचणीवर आजच निकाल दिला जाईल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.