कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांच्यासह पत्नी रुजिरा बॅनर्जी यांची कोलकातामध्ये चौकशी करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. चौकशीदरम्यान अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) अधिकाऱ्यांना सुरक्षा पुरवण्याची जबाबदारी राज्य सरकारवर टाकण्यात आली आहे. (Supreme Court Latest Marathi News)
चौकशीसाठी दिल्लीमधील मुख्यालयात हजर राहण्याची नोटीस ईडीने अभिषेक बॅनर्जी व त्यांच्या पत्नीला बजावली होती. त्याविरोधात बॅनर्जी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत कोलकातामध्ये चौकशी करावी, तिथेही त्यांचे कार्यालय आहे, अशी मागणी केली होती. ही मागणी मंगळवारी न्यायालयाने मान्य केली आहे. (SC directs ED to interrogate TMC leader Abhishek Banerjee)
मंगळवारी झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयाने कोलकातामध्ये ईडीला सहकार्य करण्यास सांगितले आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांना सुरक्षा देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. राज्य सरकारच्या यंत्रणांद्वारे कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही, असं न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.
चोवीस तासांची नोटीस बजावून कोलकातामध्ये त्यांची चौकशी केली जाऊ शकते. ईडीच्या अधिकाऱ्यांबद्दल काही तक्रारी आली तर न्यायालयाच्या परवानगीशिवाय कोणतीही कठोर कारवाई करू नये, असंही न्यायालयाने म्हटलं आहे. ईडी आणि गृह विभागाला नोटीस पाठवून उत्तर मागवण्यात आलं आहे.
मागील अनेक महिन्यांपासून ईडीकडून या प्रकरणाची चौकशी केली जात आहे. तृणमूल काँग्रेसच्या अन्य काही नेत्यांची चौकशीही ईडीने केली आहे. स्वत: अभिषेक बॅनर्जी हे चौकशीला दिल्लीत हजर राहिले आहेत. भाजपकडून जाणीवपूर्वक त्रास देण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा वापर केला जात असल्याची टीका तृणमूलकडून करण्यात आली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.