मोठी बातमी : राष्ट्रपतीपदासाठी सुशीलकुमार शिंदेंचे नाव पुढे; काँग्रेसश्रेष्ठींच्या निरोपानंतर दिल्लीत दाखल!

दिल्लीतून पक्षश्रेष्टींचा निरोप आल्यानंतर सुशीलकुमार शिंदे हे आपले सर्व कार्यक्रम रद्द करून तातडीने दिल्लीला पोचले आहेत. आता त्यांची पक्षश्रेष्ठींसोबत बैठक सुरु आहे
Sushilkumar Shinde
Sushilkumar ShindeSarkarnama
Published on
Updated on

सोलापूर : राष्ट्रपतीपदाच्या (President) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत वेगवान घडामोडी घडत आहेत. दिल्लीत काही दिवसांपूर्वी झालेल्या काँग्रेससह १८ विरोधी पक्षांच्या बैठकीत ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढविण्यास नकार दिला होता. त्यानंतर पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल गोपालकृष्ण गांधी आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुला यांची नावे पुढे आली. मात्र, त्यांना तेवढा प्रतिसाद मिळताना दिसून येत नाही. त्यामुळे सर्वपक्षीयांशी सौहार्दपूर्ण संबंध असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांचे नाव पुढे आल्याचे दिसून येत आहे. त्यातून काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी त्यांना तातडीने दिल्लीला पाचारण केले असून विरोधकांकडून राष्ट्रपतीपदासाठी शिंदे सर्वसमावेशक उमेदवार ठरू शकतात, अशी चर्चा दिल्लीच्या राजकीय वर्तुळात आहे. (Sushilkumar Shinde's name under discussion for the post of President; Meeting begins in Delhi)

दरम्यान, दिल्लीतून पक्षश्रेष्टींचा निरोप आल्यानंतर सुशीलकुमार शिंदे हे आपले सर्व कार्यक्रम रद्द करून तातडीने दिल्लीला पोचले आहेत. आता त्यांची पक्षश्रेष्ठींसोबत बैठक सुरु आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची मुदत २४ जुलैला संपणार आहे. तत्पूर्वी, २९ जूनपर्यंत अर्ज करावा लागणार आहे. येत्या १८ जुलैला मतदान होणार असून २१ जुलैला निकाल लागणार आहे.

Sushilkumar Shinde
राष्ट्रवादीचे आमदार मोहितेंची नाराजी कायम; मतदान काही तासांवर तरीही मुंबईत पोचले नाहीत!

राष्ट्रपदीपदासाठी भाजपकडून उमेदवारीबाबत कमालीची गुप्तता पाळली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मागील निवडणुकीप्रमाणे चर्चेतील नावापेक्षा वेगळे नाव काढल्यास आश्चर्य वाटायला नको. दुसरीकडे विरोधी पक्षांकडून सर्वसमावेश असा उमेदवार शोधला जात आहे. त्यासाठी २९ जूनपर्यंत अर्ज करावे लागणार असल्याने अखिल भारतीय काँग्रेस समितीतर्फे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांना दिल्लीचे निमंत्रण आले. रविवारचे सर्व कार्यक्रम रद्द करून ते राजधानीत दाखल झाले आहेत. पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी आजारी असल्याने रुग्णालयात आहेत. सोमवारी राहुल गांधी यांना पुन्हा एकदा ईडीने चौकशीसाठी बोलावले आहे. राष्ट्रपतीची निवडणूकही जवळ आली आहे. या पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्त्व प्राप्त झाले आहे.

Sushilkumar Shinde
मोठी घडामोड : मतदानाला काही तास उरले असतानाच राष्ट्रवादी अन्‌ भाजप नेत्यांची भेट!

पक्षाच्या अडचणीच्या काळात अनेकांनी साथ सोडली. पण, सुशीलकुमार शिंदे व त्यांची कन्या आमदार प्रणिती शिंदे या पक्षासाठी महेनत घेत आहेत. दरम्यान, ज्योतिरादित्य शिंदे हे यापूर्वीच भाजपमध्ये दाखल होऊन केंद्रीय मंत्री झाले आहेत. माजी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री कपिल सिब्बल यांनीही अपक्ष राहून वेगळी वाट धरली असून ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांच्यासह अनेकजण राजकारणापासून अलिप्त असल्याची स्थिती आहे. सत्ता नसल्याने सैरभैर झालेल्या काँग्रेसजनांच्या मागे आता ‘ईडी’ लागली आहे. अशा परिस्थितीत सुशिलकुमार शिंदे यांचा पक्षाला आधार वाटत आहे.

Sushilkumar Shinde
‘आप्पा, तुम्ही मला शिव्या घातल्या...’ दरेकरांच्या वक्तव्यावर ठाकूर म्हणाले, ‘प्रसादला नक्कीच...’

दरम्यान, सुशीलकुमार शिंदे यांना २००२ मध्ये भैरवसिंह शेखावत यांच्याविरूद्ध उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी मिळाली होती. त्यावेळी मतांच्या अंदाजात शेखावत विजयी होणार, हे निश्चित होते. तरीही शिंदे यांनी पक्षाचा आदेश मानून उमेदवारी अर्ज भरला होता. आता राष्ट्रपतीपदासाठी भाजप देईल, तोच उमेदवार विजयी होईल, अशी एकंदर स्थिती आहे. तरीही या निवडणुकीत शिंदे हेच सर्वपक्षीय सर्वसमावेशक असे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार असतील, अशी चर्चा आहे. दरम्यान, राहुल गांधी यांना सोमवारी (ता. २०) पुन्हा ईडीच्या कार्यालयात चौकशीला जावे लागणार आहे. यासंदर्भातही या बैठकीत चर्चा होईल, असे बोलले जात आहे.

Sushilkumar Shinde
'मुक्ता टिळक मतदानाला येणार; पण लक्ष्मण जगतापांबाबत फडणवीस...'

राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीतील ठळक मुद्दे

- २९ जूनपर्यंत नामांकन अर्ज भरणे, १८ जुलै रोजी मतदान आणि २१ जुलै रोजी निकाल

- राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी एकूण १०,८०,१३१ मतांची गोळाबेरीज असेल. ज्या उमेदवाराला ५,४०,०६५ पेक्षा जास्त मतमूल्य मिळेल, तो उमेदवार विजयी होईल.

- राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी ७६७ खासदार (५४० लोकसभा, २२७ राज्यसभा) आणि एकूण ४,०३३ आमदार मतदान करतील. प्रत्येकी - एका खासदाराच्या मताचं मूल्य ७०० इतकं आहे. म्हणजेच एकूण मतांचं मूल्य ३,१३,६०० आहे.

- राज्याची लोकसंख्या आणि एकूण आमदारांच्या संख्येवरून आमदारांच्या मतांचं मूल्य ठरवलं जातं.

- यूपीमध्ये २०८ तर सिक्कीममध्ये फक्त ७ आमदार आहेत.

- एकूण ४०३३ आमदारांचं मतमूल्य ५,४३,२३१ इतकं आहे. अशा प्रकारे निवडणुकीसाठी एकूण मतमूल्य १०,८०,१३१ इतकं असते.

- या निवडणुकीत जिंकण्यासाठी ५० टक्के म्हणजेच ५,४०,०६५ पेक्षा जास्त मत आवश्यक आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com