Bansuri Swaraj News: माजी केंद्रीय मंत्री, दिवंगत नेत्याच्या मुलीवर भाजपने सोपवली मोठी जबाबदारी

Bansuri Swaraj Delhi BJP has given Big Responsibility : सचदेवा यांनी दिलेले नियुक्त पक्ष बांसुरी यांनी आपल्या टि्वटवरुन पोस्ट केले आहे.
Bansuri Swaraj
Bansuri SwarajSarkarnama

Delhi BJP News: माजी परराष्ट्रीय मंत्री, भाजपच्या दिवंगत नेत्या सुषमा स्वराज यांची कन्या बांसुरी स्वराज यांना भाजपने मोठी जबाबदारी सोपवली आहे. बांसुरी स्वराज यांची दिल्ली भाजप प्रदेश लीगल सेलच्या सह-संयोजकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

बांसुरी स्वराज सध्या सुप्रीम कोर्टात प्रॅक्टीस करतात. त्यांच्यावर भाजपनं ही बजाबदारी दिल्याने त्या राजकारण सक्रिय झाल्या आहेत. ही जबाबदारी मिळण्यासाठी बांसुरी स्वराज या इच्छुक होत्या, या नियुक्तीनंतर त्यांनी पतंप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक भाजप नेत्याचे आभार मानले आहे.

Bansuri Swaraj
Rahul Gandhi यांची खासदारकी रद्द झाली ; याआधी लालू प्रसाद यादव, जयललितांसह भाजप नेत्यांवर आली होती ही वेळ

दिल्ली प्रदेश अध्यक्षपदी वीरेंद्र सचदेवा यांनी जबाबदारी मिळाल्यानंतर त्यांनी बांसुरी स्वराज यांची या पदावर नियुक्ती करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. सचदेवा यांनी दिलेले नियुक्त पत्र बांसुरी यांनी आपल्या टि्वटवरुन पोस्ट केले आहे.

'ही नियुक्ती लगेचच लागू व्हावी, बांसुरी स्वराज यांच्यावर दिलेल्या या जबाबदारीमुळे भाजपला बळ मिळेल, असे सचदेवा यांनी पत्रात म्हटलं आहे. बांसुरी या प्रसिद्ध वकील असून त्यांनी यापूर्वीही भाजपला अनेक कायदेशीर विषयात मदत केली आहे. ही संधी दिल्याबाबत त्यांनी मोदी, गृहमंत्री अमित शाह, राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचे आभार मानले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com