Seema Patra : मोलकरणीवर अत्याचार करणाऱ्या भाजपच्या निलंबित नेत्या सीमा पात्रा यांना अटक

Seema Patra : पीडित महिलेचा या अत्याचाराबाबतचा एक व्हिडिओ समोर आल्यानंतर भाजपने सीमा पात्रा यांनी पक्षातून निलंबित केले आहे.
Seema Patra
Seema Patra sarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली : घरगुती नोकर म्हणून काम करणाऱ्या महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी भाजपच्या (bjp) निलंबित नेत्या आणि माजी आयएएस अधिकाऱ्याची पत्नी सीमा पात्रा (Seema Patra) यांना रांची पोलिसांनी अटक केली आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर जनतेमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

रांचीचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक किशोर कौशल यांनी सीमा पात्रा यांना ताब्यात घेतल्याचे सांगितले. इतर औपचारिकता पूर्ण केल्या जात आहेत. त्यांना लवकरच न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

एका २९ वषीय महिलेवर त्यांनी अत्याचार केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पात्रा यांना आज पोलिसांनी अटक केली आहे. वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

गेल्या आठवड्यात हे प्रकरण समोर आले होते. काल (मंगळवारी) पोलिसांनी सांगितले होते की, गुन्हा दाखल झाल्यानंतर आम्ही सीमा पात्राला अटक करू शकतो. या प्रकरणी आयपीसीच्या विविध कलमांखाली तसेच एससी/एसटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Seema Patra
Lalbaugcha Raja : पहिल्याच दिवशी महिला भाविक-सुरक्षारक्षक भिडले, लालबागचा राजाच्या दरबारात धक्काबुक्की

काही दिवसापूर्वी समाज माध्यमावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये पीडित महिलेने आरोप केला होता की, सीमा पात्रा यांनी तिच्यावर अमानुषपणे अत्याचार केले. तिला गरम तव्याने आणि काठ्यांनी मारहाण करण्यात आली. या मारहाणीत तिचे दात तुटले. तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचे पीडितेने सांगितले होते.

भाजपच्या महिला शाखेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्या म्हणून सीमा पात्रा काम करीत होत्या. त्यांचे पती महेश्वर पात्रा हे निवृत्त आयएएस अधिकारी आहेत. पीडित महिलेचा या अत्याचाराबाबतचा एक व्हिडिओ समोर आल्यानंतर भाजपने सीमा पात्रा यांनी पक्षातून निलंबित केले आहे.

पोलिसांना एका सरकारी कर्मचाऱ्याकडून याबाबत माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.न्यायाधीशासमोर काल (मंगळवारी)पीडित महिलेचाा जबाब घेण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात पोलिसांनी या पीडित महिलेची सीमा पात्रा यांच्या घरातून सुटका केली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com