पक्षातून हकालपट्टी होताच गांधी परिवारावर टाकला लेटर बॉम्ब; काँग्रेसमध्ये खळबळ

Congress | Uttar pradesh | Assembly election : प्रियांका गांधी असताना आम्हाला शिपायाच्या नेमणुकीचे अधिकार नाहीत. ३८० जागांवर काँग्रेसचे डिपॉझिट जप्त
Priyanka, Rahul and Sonia Gandhi
Priyanka, Rahul and Sonia Gandhi File Photo
Published on
Updated on

दिल्ली : ५ राज्यांच्या निवडणुकीचा निकाल लागून आता १० दिवस उलटले आहेत. मात्र काँग्रेसमधील (congress) वादळ अद्याप शांत होताना दिसून येत नाही. काँग्रेसच्या या दारुण पराभवाला गांधी (Gandhi Family) कुटुंबीय जबाबदार असून पक्षाध्यक्ष सोनिया गांधी (Soniya Gandhi), खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि पक्षाच्या महासचिव प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी मागील काही दिवसांपासून दबक्या आवाजात होत आहे. या भावना लक्षात घेवून, पक्षाला वाटले तर आम्ही तिघेही राजीनामा द्यायला तयार आहोत,'' असे सोनिया गांधी म्हणाल्या होत्या.

मात्र काँग्रेस नेत्यांनी सोनिया गांधी यांचा राजीनामा घेण्यास नकार दिला आहे. ''काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी याच आमचे नेतृत्व करतील आणि भविष्यातील पावले उचलतील. आम्हाला सर्वांना त्यांच्या नेतृत्वावर विश्वास आहे,'' असं पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीनंतर काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलं आहे. चिंतन शिबिरात पराभवावर चर्चा झाल्यावरच याबाबत निर्णय होणार असल्याचे पक्षाकडून ठरविण्यात आले आहे.

Priyanka, Rahul and Sonia Gandhi
Shivsena : पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या स्वभावाचा राष्ट्रवादी गैरफायदा घेत आहे...

मात्र आज प्रथमच जाहिररीत्या महासचिव प्रियांका गांधी यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश काँग्रेसचे निलंबित प्रवक्ते जीशान हैदर यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहुन प्रियांका गांधी यांचा उत्तर प्रदेश प्रभारी पदाचा राजीनामा घ्यावा अशी मागणी केली आहे. आपल्या पत्रात हैदर म्हणातात, पराभावाचे संपूर्ण खापर प्रदेशाध्यक्षांवर फोडणे चुकीचे आहे. कारण राज्यातील सगळ्या काँग्रेसच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना माहित आहे की प्रभारी जर स्वतः प्रियांका असतील तर प्रदेशाध्यक्ष स्वतःच्या मर्जीने साध्या शिपायाची देखील नेमणूक करु शकत नाहीत.

Priyanka, Rahul and Sonia Gandhi
धामी यांच्यामुळं मौर्य यांनाही लॉटरी; हरूनही उपमुख्यमंत्रिपद राहणार कायम

हैदर यांनी या पत्रात २०१२ ला दिग्विजय सिंह, रिटा बहुगुणा जोशी, २०१७ मध्ये गुलाम नबी आझाद, राज बब्बर यांनी राजीनामा दिल्याची आठवण करुन दिली आहे. त्यामुळे आता सर्वांना समान न्याय प्रमाणे प्रियांका गांधी यांनीही राजीनामा द्वावा अशी मागणी केली आहे. हैदर यांच्या या पत्रामुळे काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली असून राहुल गांधींपाठोपाठ आता प्रियंका गांधीही निशाण्यावर आल्या आहेत. हैदर यांचे मागील आठवड्यात काँग्रेस पक्षातून निलंबन करण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com