NCP News : राष्ट्रवादीच्या कटकटी संपेनात : लोकसभेतील एकाची खासदारकी जाणार; संख्याबळ घटणार

सर्वोच्च न्यायालयाच्या २०१३ मधील निर्णयानुसार दोन वर्षांपेक्षा जादा काळ शिक्षा झाली असेल कुठल्याही लोकप्रतिनिधीस तातडीने निलंबित करण्यात येते.
NCP MP Mohammad Fazal
NCP MP Mohammad FazalSarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) लोकसभेतील (Lok sabha) संख्याबळ एकने कमी होण्याची शक्यता आहे. कारण लक्षद्वीपमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार (MP) मोहम्मद फजल यांना खूनी हल्ल्याप्रकरणी १० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या २०१३ मधील निर्णयानुसार दोन वर्षांपेक्षा जादा काळ शिक्षा झाली असेल कुठल्याही लोकप्रतिनिधीस तातडीने निलंबित करण्यात येते. त्यामुळे राष्ट्रवादीचे लोकसभेतील संख्याबळ एकने घटण्याची शक्यता जादा आहे. (Suspension action against NCP MP Mohammad Fazal)

मोहम्मद फजल हे लक्षद्वीपचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आहेत. महाराष्ट्राबाहेर निवडून आलेले ते राष्ट्रवादीचे एकमेव खासदार आहेत. २०१४ च्या मोदी लाटेतसुद्धा फजल हे लक्षद्वीपमधून राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आले होते. मात्र, त्यांना २००९ मधील एका राजकीय प्रकरणात ज्यात त्यांनी खुनी हल्ला केला होता, असा आरोप खासदार फजल यांच्यावर करण्यात आला होता. त्या प्रकरणात केरळमधील एका जिल्हा सत्र न्यायालयाने दोन दिवसांपूर्वी त्यांना दोषी ठरवून १० वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

NCP MP Mohammad Fazal
Sunil Kedar मोठी बातमी : काँग्रेसचे माजी मंत्री सुनील केदार यांना एक वर्षाची शिक्षा

सन २०१३ मधील लीली थॉमस प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाचे जे जेजमेंटनुसार कोणत्याही लोकप्रतिनिधीला दोन वर्षांपेक्षा जास्त काळ शिक्षा झाली असेल तर संबंधित लोकप्रतिनिधी तत्काळ निलंबित होतो. पूर्वीच्या नियमानुसार एखाद्या प्रकरणात लोकप्रतिनिधी दोष आढळला तर त्याला दाद मागता येत होती. मात्र, २०१३ च्या जजमेंटनंतर तातडीने निलंबनाच्या कारवाईचा बदल झाला आहे.

NCP MP Mohammad Fazal
Balasaheb Thorat News: बाळासाहेब थोरातांचा भाजपच्या बड्या नेत्याला फोन : ‘सत्यजित तांबेंना उमेदवारी...’

खासदार फजल यांना सध्या कन्नूरच्या सेंट्रलमध्ये ताब्यात घेण्यात आलेले आहे. या प्रकरणातून त्यांना तातडीने बाहेर काढणे आणि त्यानंतर राजकीय लढाई लढण्यात येईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसकडून सांगण्यात आले. मोहम्मद फजल यांनी जिल्हा न्यायालयाच्या निर्णयाविरोधात केरळ उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. केरळ उच्च न्यायालयात मंगळवारपर्यंत ते तहकूब आहे. तोपर्यंतच्या काळात फजल यांच्यावर निलंबनाची कारवाई होते का हे पहावे लागेल.

NCP MP Mohammad Fazal
राष्ट्रवादीकडील मुंबई बाजार समिती ताब्यात घेण्याचा मुख्यमंत्र्यांचा डाव भाजपने उधळला; फडणवीसांनी सूत्रे हलवली?

दरम्यान, निलंबनाच्या कारवाईचा अधिकार हा निवडणूक आयोगाचा असतो, त्यानुसार फजल यांच्यावर निलंबनाची कारवाई ही निवडणूक आयोगाकडून होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी आपला लोकसभेतील खासदार कशा पद्धतीने वाचवते हे पाहणे औत्सुक्याचे आहे. एकंदरीत, राष्ट्रवादी काँग्रेस मागील कटकटी काही केल्या कमी होण्याची चिन्हे नाहीत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com