तेलगू देसम पार्टी माझे चारित्र्यहनन करीत आहे : वाय. एस. शर्मिला

काँग्रेसचे मुख्यमंत्री राहिलेल्या वाय.एस.आर. रेड्डी यांच्या त्या कन्या आहेत .
YS-sharmila-Prabhas
YS-sharmila-Prabhas
Published on
Updated on

हैदराबाद :  " तेलगू देसम पक्षातर्फे माझे चारित्र्यहनन केले जात आहे. चित्रपट अभिनेता प्रभास याच्याबरोबर माझे नाव जोडून माझी बदनामी केली जात आहे. निवडणुका समोर असल्याने हा अपप्रचार केला जात आहे,'' अशी तक्रार वाय. एस. आर. कॉंग्रेस पक्षाचे प्रमुख वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांच्या भगिनी वाय. एस. शर्मिला यांनी पोलिसात केली आहे.

काँग्रेसचे मुख्यमंत्री राहिलेल्या वाय.एस.आर. रेड्डी यांच्या त्या कन्या आहेत . वाय.एस.आर. रेड्डी यांच्या निधनानंतर  त्यांचे चिरंजीव वाय. एस. जगनमोहन रेड्डी  यांनी  वाय. एस. आर. कॉंग्रेस पक्षाची स्थापना केली होती . शर्मिला या आपले बंधू जगनमोहन यांना राजकारणात मदत करतात . तेलगू देशम हा तेलंगणातील प्रबळ पक्ष आहे . या दोन पक्षात आताच संघर्ष सुरु झाला असून सोशल मीडियावर प्रचाराची खालची पातळी गाठली गेली आहे . 
 
वाय. एस. शर्मिला यांनी असे म्हटले आहे की, " 2014 च्या निवडणुकीच्या वेळी माझ्याविरुद्ध असा अपप्रचार सोशल मिडियावर झाला होता. चित्रपट अभिनेता प्रभास याची माझी ओळख नाही. त्याच्याशी मी कधी बोललेली नाही. मी एक माता आहे, पत्नी आहे आणि कुटुंबवत्सल स्त्री आहे. अशी बदनामीकारक मोहीम मनाला खूप त्रास देऊन जाते. अशा विषयात मी मौन बाळगले असते तर चुकीचा अर्थ निघाला असता म्हणून मी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.''

वाय. एस. शर्मिला यांनी त्यांचे पती अनिलकुमार आणि पक्षाच्या अन्य नेत्यांबरोबर हैदराबादचे पोलिस आयुक्त अंजनीकुमार यांची भेट घेऊन तक्रार दाखल केलेली आहे.

'बाहुबली' या चित्रपटामुळे देशभरात प्रसिद्धीच्या झोतात आलेला अभिनेता प्रभास याने करण जोहरच्या कार्यक्रमात या संदर्भात विचारणा झाली असता प्रभास यांनी सांगितले की, " वाय. एस. शर्मिला यांच्याशी आपले कुठलेही संबंध नाहीत. त्या विवाहित आहेत. त्यांचे नाव अशा पद्धतीने जोडणे चूक आहे.''

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com