Patna News : जातीनिहाय जनगणनेच्या आकडेवारीवरून भाजप आणि राष्ट्रीय जनता दल यांच्यात आरोप-प्रत्यारोप होत आहेत. भाजप नेते आणि गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी बिहारमध्ये एका मेळाव्याला संबोधित करताना नितीश कुमार सरकारच्या जातीय आकड्यांवर प्रश्न उपस्थित करत मुस्लिम आणि यादवांची लोकसंख्या फुगवली असल्याचा आरोप केला होता. यावर आता उपमुख्यमंत्री आणि आरजेडी नेते तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांनी अमित शाह (Amit Shah) यांच्या वक्तव्यावर जोरदार प्रहार केला आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
तेजस्वी यादव म्हणाले, जर बिहारच्या जातीनिहाय जनगणनेची आकडेवारी चुकीची असेल, तर केंद्र सरकार संपूर्ण देशात आणि सर्व राज्यांमध्ये जातीनिहाय जनगणना का करत नाही आणि त्याची आकडेवारी जाहीर का करत नाही ? असा तिखट सवला केला. भाजपशासित राज्यांमध्ये भाजप (BJP) जनगणना का करत नाही ?
केंद्र सरकारमध्ये किती 𝐎𝐁𝐂/𝐒𝐂/𝐒𝐓 कॅबिनेट मंत्री आहेत आणि किती गैर-𝐎𝐁𝐂/𝐒𝐂/𝐒𝐓 आहेत ? यादी जाहीर करा. भाजपकडे किती मुख्यमंत्री आहेत ? 𝐎𝐁𝐂/𝐒𝐂/𝐒𝐓 मागास आणि बिगर मागास मुख्यमंत्र्यांची तुलनात्मक टक्केवारी सांगा ? बिहारमधून केंद्रात भाजपचे किती मागासलेले आणि अत्यंत मागासलेले 𝐂𝐀𝐁𝐈𝐍𝐄𝐓 मंत्री आहेत? 𝐙𝐄𝐑𝐎 𝟎 आहेत ? तुम्ही उत्तर दिले तर तुमच्या बरोबरच सगळ्याचे डोळे उघडतील, असे तेजस्वी म्हणाले.
अमित शाह यांनी रविवारी बिहारमधील नितीश कुमार सरकारवर जातीनिहाय सर्वेक्षणात मुद्दाम मुस्लिम आणि यादवांची लोकसंख्या वाढवल्याचा आरोप करत हा 'तुष्टीकरणाच्या राजकारणाचा' भाग असल्याचे म्हटले होते. "बिहारमध्ये जात सर्वेक्षणाचा निर्णय नितीश कुमार (Nitish Kumar) एनडीएमध्ये असतानाच घेण्यात आलो होता, असेही म्हटले होते.
Edited by : Amol Jaybhaye
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.