Telangana Election 2023 : कामारेड्डीत रेवंथ रेड्डी 'डेंजर झोन'मध्ये; भाजप बाजी मारणार ?

KCR Vs Revanth Reddy : के. चंद्रशेखर राव कामारेड्डीतून दुसऱ्या स्थानावर
Revanth Reddy, Katipalli Venkata Ramanna Reddy
Revanth Reddy, Katipalli Venkata Ramanna ReddySarkarnama
Published on
Updated on

Telangana Election Result : राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भाजपने बाजी मारली आहे. तेलंगणात मात्र सत्ताधारी बीआरएसला पायउतार होण्याची वेळ आली आहे. बीआरएसपुढे काँग्रेस नेते रेवंथ रेड्डींनी मोठे आव्हान उभे केले, तर कामारेड्डी मतदारसंघातून रेड्डींनी मुख्यमंत्री केसीआर यांच्या विरोधात दंड थोपटले. या मतदारसंघातून केसीआर आणि रेवंथ रेड्डी यांच्यामध्ये काँटे की टक्कर दिसून येत आहे. सध्या केसीआर दुसऱ्या, तर रेवंथ रेड्डी तिसऱ्या स्थानावर फेकले गेले आहेत.

कामारेड्डीमधून मतमोजणी सुरू झाल्यापासून काँग्रेसचे रेवंथ रेड्डी पहिल्या स्थानावर होते. दुपारनंतर मात्र भाजपचे तिसऱ्या स्थानावरील असलेले कट्टीपल्ली वेंकटा रामा रेड्डी यांनी आघाडी घेत पहिल्या स्थानावर मुसंडी मारली, तर रेवंथ हे दुसऱ्या स्थानावर गेले. यानंतर तिसऱ्या स्थानावर असलेले मुख्यमंत्री केसीआर हे दुसऱ्या स्थानावर पोहाेचले. परिणामी रेवंथ तिसऱ्या स्थानावर ढकलले गेले आहेत.

Revanth Reddy, Katipalli Venkata Ramanna Reddy
Ajit Pawar : तेलंगणाच्या निकालाचे अजित पवारांनी केले अजब विश्लेषण ; म्हणाले...

कटीपल्ली रेड्डींना सध्या ५० हजार २९४ मते मिळाली आहेत, तर केसीआर यांनी ४६ हजार ७८० मते घेतली आहे. तिसऱ्या स्थानावर असलेल्या (Revanth Reddy) रेवंथ रेड्डींना ४५ हजार ४१९ मते आहेत. कामारेड्डीत तीनही उमेद्वारांमध्ये घासून चाललेल्या लढतीमुळे भाजप, बीआरएस आणि काँग्रेसची धाकधूक वाढली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काँग्रेसचं टेन्शन वाढलं

रेवंथ रेड्डींनी तेलंगणात काँग्रेसला (Telangana Congress) बहुमतापर्यंत पोहाेचवण्यासाठी जिवाचे रान केले. मात्र, कामारेड्डीमधून ते थेट तिसऱ्या स्थानावर पडल्याने काँग्रेसच्या गोटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. भाजपचे कटीपल्ली आणि रेवंथ यांच्यात सध्या चार हजार ८५० मतांचा फरक आहे. या मतदारसंघात घासून चाललेल्या लढतीकडे देशाचे लक्ष लागले आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Revanth Reddy, Katipalli Venkata Ramanna Reddy
Assembly Elections Results 2023 : मध्य प्रदेशात केंद्रीय मंत्र्यांची हार; गृहमंत्रीही पराभवाच्या छायेत

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com