Mahmood Ali Slaps Security Constable: ...अन् गृहमंत्र्यांनी थेट बॉडीगार्डच्या कानशिलात लगावली

Home Minister Mahmood Ali : तेलंगणाच्या गृहमंत्र्यांनी चक्क बॉडीगार्डच्या कानाखाली लगावल्याचे समोर आले आहे.
Home Minister Mahmood Ali
Home Minister Mahmood AliSarkarnama
Published on
Updated on

Telangana : तेलंगणाच्या गृहमंत्र्यांनी चक्क बॉडीगार्डच्या कानशिलात लगावल्याचे समोर आले आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून, लवकर बुके न दिल्याने गृहमंत्री महोदयांनी संबंधित बॉडीगार्डच्या थेट कानाखाली वाजवली. या घटनेनंतर आता विरोधकांनी या मंत्री महोदयांवर जोरदार निशाणा साधला आहे.

Home Minister Mahmood Ali
Pune ACB Trap: 'एसीबी'चा जोरदार दणका; लोणावळा पोलिस ठाण्यातील 'एपीआय'च लाचखोरीत अडकला

तेलंगणाचे गृहमंत्री महमूद अली यांनी तेलंगणाचे पशुसंवर्धनमंत्री तलसानी श्रीनिवास यादव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मात्र, याच वेळी शुभेच्छा देताना बॉडीगार्डने बुके लवकर न दिल्याने मंत्री महोदयांना राग अनावर झाला आणि थेट व्यासपीठावरच बॉडीगार्डच्या कानशिलात लगावली. या वेळी तेथे काही वेळ गोंधळ उडाला. या घटनेचा व्हिडिओ जोरदार व्हायरल झाल्यानंतर आता देशभरातून गृहमंत्री महमूद अली यांच्यावर टीका होत आहे.

दरम्यान, ही घटना घडली या वेळी तेथे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह'बीआरएस' पक्षाचे कार्यकर्तेही उपस्थित होते. यानंतर आता गृहमंत्री महमूद अली यांच्या या कृत्यावरून तेलंगणा सरकारवर टीका होत असून, या प्रकरणी महमूद अली यांनी माफी मागावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

दरम्यान, तेलंगणा विधानसभेच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. या निवडणुका जिंकण्यासाठी भाजपसह काँग्रेसने जोरदार तयारी सुरू केली आहे, तर दुसरीकडे 'बीआरएस'नेदेखील जोरदार प्लॅनिंग आखलं आहे.

सध्या तेलंगणामध्ये 'बीआरएस' पक्षाचे सरकार आहे. मात्र, याच सरकारमधील एका मंत्र्याने बॉडीगार्डच्या कानशिलात लगावल्याने 'बीआरएस'वर टीका होऊ लागली आहे. तसेच हाच मुद्दा पुढे प्रचारातदेखील गाजण्याची शक्यता आहे.

Edited by Ganesh Thombare

Home Minister Mahmood Ali
Pune ACB Trap: 'एसीबी'चा जोरदार दणका; लोणावळा पोलिस ठाण्यातील 'एपीआय'च लाचखोरीत अडकला

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com