पाकिस्तानात दोन गटात तुफान हाणामारी; हल्ल्यात दहा जणांचा मृत्यू

वायव्य पाकिस्तानमधील खुर्रम जिल्हा अफगाणिस्तानच्या सीमेवर आहे.
पाकिस्तानात दोन गटात तुफान हाणामारी; हल्ल्यात दहा जणांचा मृत्यू
Published on
Updated on

नवी दिल्ली : पाकिस्तानच्या आदिवासी भागात (Pakistan’s Tribal Area) वनजमिनीवर कब्जा करण्यावरून दोन गटांमध्ये मारामारी झाल्याचे वृत्त समोर आले आहे. या मारामारीत गोळीबारही करण्यात आला, ज्यात किमान 10 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 15 जण जखमी झाले आहेत. पाकिस्तानातील स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे.

अधिकाऱ्यांनी रविवारी ही माहिती दिली आहे. ही घटना देशाच्या वायव्य भागात घडली आहे. राज्याच्या राजधानी पेशावरपासून 251 किमी अंतरावर असलेल्या खुर्रम जिल्ह्यातील (Khurram District) तेरी मेगल गावात राहणाऱ्या गायडू जमातीतील लोकांनी गावात जळाऊ लाकूड उचलणाऱ्या पेवार कुळातील सदस्यांवर हल्ला केल्याची घटना शनिवारी दुपारी घडली.

पाकिस्तानात दोन गटात तुफान हाणामारी; हल्ल्यात दहा जणांचा मृत्यू
आमदार दिलीप बनकरांनी रानवड कारखाना सुरु करीत शब्द पाळला!

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानातील खुर्रम जिल्ह्याच्या आदिवासी भागातील जंगलाच्या मालकीवरून गेल्या काही महिन्यांपासून दोन जमातींमध्ये तणाव सुरू होता. हा तणाव शनिवारी (२३ ऑक्टोबर) विकोपाला गेला आणि दोन्ही गटात तुफान मारामारी झाली. या मारामारीत शनिवारी चार जणांचा मृत्यू झाला, तर रविवारी (२४ ऑक्टोबर) सहा जणांचा मृत्यू झाला, जेव्हा पेवार समाजातील आदिवासींनी हल्ला केल्या त्याला प्रत्युत्तर दरीत लपून बसलेल्या बंदुकधाऱ्यांनीही हल्ला केला. या चकमकीत दोन्ही बाजूंनी शस्त्रे आणि अगदी रॉकेट लाँचरचाही वापर केला गेला.मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

वायव्य पाकिस्तानमधील खुर्रम जिल्हा शेजारच्या अफगाणिस्तानच्या सीमेवर आहे. जिथे गुन्हेगारी आणि दहशतवादी हल्ल्यांमध्ये बंदुकीचा वापर वारंवार केला जातो. या हल्ल्यानंतर आता आदिवासी समाजातील ज्येष्ठ आणि सरकारी अधिकारी गायडू आणि पेवार समाजात समेट घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच येथील तणाव अजून वाढू नये म्हणून याठिकाणी पोलीस आणि निमलष्करी दले या भागात पाठवण्यात आली आहेत.

पाकिस्तानमध्ये गुन्हेगारी झपाट्याने वाढत आहे. गेल्या आठवड्यात एका 50 वर्षीय व्यक्तीने चोरीच्या प्रकरणात पत्नी आणि दोन मुलींची गोळ्या घालून हत्या केली. देशातील खैबर पख्तूनख्वा प्रांतातील स्वाबी जिल्ह्यातील कालू खान पोलीस ठाण्याच्या अंतर्गत ही घटना घडली. जन बहादूर असे आरोपीचे नाव आहे. त्याची पत्नी आणि मुलींनी मर्दान मेडिकल कॉम्प्लेक्समधून नवजात अर्भक चोरल्याचा त्याला संशय होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com