Terrorist Attack : मोठी बातमी! जम्मू-काश्मीरमध्ये यात्रेकरूंच्या बसवर दहशतवादी हल्ला; दहा जणांचा मृत्यू

Terrorist attack on pilgrim अनेकजण जखमी झाले आहेत; घटनास्थळी मृतदेह पसरलेले होते, स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य सुरू
Terrorist attack on pilgrim
Terrorist attack on pilgrimSarkarnama

Terrorist attack on pilgrim in Jammu kashmir जम्मू-काश्मीरमध्ये यात्रेकरू प्रवास करत असलेल्या एका बसवर मोठा दहशतवादी हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. प्राप्त माहितीनुसार या हल्ल्यात दहा जणांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यानंतर बस दरीत कोसळली. ही बस शिवखोडा मंदिर येथून कटराकडे जात होती. तेव्हाच दहशतवाद्यांनी बसवर गोळीबार केला.

या हल्ल्यात बसचेही मोठे नुकसान झाले आणि घटनास्थळी मृतदेह इतरत्र पडलेले होते. यानंतर स्थानिकांनी जखमींच्या मदतीसाठी घटनास्थळी धाव घेतली. रस्ता खराब असल्याने जखमींना रुग्णवाहिकेपर्यंत नेण्यासाठी स्थानिक नागरिकांनी मदत केली.

पोलीस अधिकाऱ्यांनी प्राथमिक माहिती देताना सांगितले, शिवखोडी मंदिर परिसरातून जात असलेल्या यात्रेकरूंच्या बसवर पोनी भागातील तेरयाथ गावात हल्ला झाला. बचावकार्य सुरू आहे. पोलीस, सेना आणि अर्धसैनिक दलाचे जवाना घटनास्थळी हजर आहेत.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com