भाजप नेता बरळला, 'एका खिशात ब्राह्मण तर दूसऱ्यात बनिया समाज'

विकासाबाबत बोलताना भाजप जातीच्या नावावर मते का मागते, असा प्रश्न त्यांना यावेळी विचारण्यात आला होता
भाजप नेता बरळला, 'एका खिशात ब्राह्मण तर दूसऱ्यात बनिया समाज'
Published on
Updated on

भोपाळ : मध्य प्रदेशातील (Madhya pradesh) भाजपचे प्रदेश प्रभारी मुरलीधर राव (Muralidhar Rao) यांच्या एका वक्तव्यावरून तेथील राजकारणात चांगलाच गोंधळ माजला आहे. बनिया समाज आणि ब्राह्मण समाज माझ्या खिशात असल्याचे वादग्रस्त वक्तव्य केल्याने राव यांच्याविरोधात राजकारण ढवळून निघालं आहे.

भोपाळमध्ये (Bhopal) आयोजित पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. भाजप कधी ब्राह्मणांचा पक्ष होता, कधी बन्यांचा पक्ष झाला, तर कधी SC, ST आणि OBC चा, मग विकासाबाबत बोलताना भाजप जातीच्या नावावर मते का मागते, असा प्रश्न त्यांना यावेळी विचारण्यात आला. त्यावर मुरलीधर राव म्हणाले, माझ्या खिशात बनिया आहे, तर दूसऱ्या खिशात ब्राह्मण आहेत. जेव्हा पक्षात ब्राह्मण कार्यकर्ते होते तेव्हा भाजप ब्राह्मणांचा पक्ष होता. जेव्हा बनिया समाजाचे कार्यकर्ता आले, तेव्हा भाजप बनिया समाजाचा पक्ष झाला. भाजप सर्वांसाठी आहे, असंही त्यांनी सांगितल.

भाजप नेता बरळला, 'एका खिशात ब्राह्मण तर दूसऱ्यात बनिया समाज'
नवाब मलिकांचे पुन्हा सूचक ट्विट, 'मेरे ख़याल को बेड़ी पहना नहीं सकते!'

'आम्ही पक्ष सर्वांसाठी सुरु केला होता. सुरुवातीला आमच्या पक्षात काही ठराविक समाजाचे लोक जास्त होते. माझ्या वोट बॅंकेत, माझ्या कार्यकर्त्यांमध्ये, नेत्यांमध्ये ब्राह्मण समाजाचे लोक जास्त होते,तेव्हा तुम्ही पक्षाला ब्राह्मणांचा पक्ष म्हणालात, तर ज्यावेळी पक्षात बनिया समाजाचे लोकही सामील झाले, तेव्हा तुम्ही पक्षाला बनियांचा पक्ष म्हणालात. पण भाजप पक्ष सर्व समाजतील लोकांसाठी सुरु केला असल्याचे मुरलीधर राव यांनी सांगितले.

दरम्यान मुरलीधर राव यांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे कॉंग्रेस खासदार कमलनाथ यांनी निशाणा साधला आहे. ट्विट करत कमलनाथ यांनी मुरलीधर राव यांनी टिकास्त्र डागले आहे. "सबका साथ- सबका विकासचा नारा देणारे आज एका विभागावर लक्ष केंद्रित करण्याबद्दल बोलत आहेत आणि उघडपणे दोन समाजांचा अपमान करत आहेत." त्यांची कसली मानसिकता, कसली विचारसरणी? सत्तेच्या लालसेसाठी भाजप कोणत्याही थराला जाऊ शकतो, 'असा सणसणीत टोला कमलनाथ यांनी लगावला आहे.

"ज्या वर्गाच्या नेत्यांनी भाजपच्या उभारणीत महत्त्वाची भूमिका बजावली, त्या वर्गाचा असा सन्मान दिला जातो ? भाजपचे नेते सत्तेच्या नशेत आणि मग्रूरीत पिसाळले आहेत. हा संपूर्ण बनिया आणि ब्राह्मण समाजांचा अपमान आहे. यासाठी भाजप नेतृत्वाने तातडीने या समाजांची माफी मागावी. सबका साथ-सबका विकासचा नारा देणारे मध्य प्रदेशचे भाजप प्रभारी आमच्या खिशात बनिया, एका खिशात ब्राह्मण असे म्हणत आहेत. हा या समाजांचा अपमान आहे, मुरलीधर राव यांनी तातडीने या समाजांची जाहीर माफी मागावी, अशी मागणी कमलनाथ यांनी केली आहे.

दरम्यान आपल्या वक्तव्यावर मुरलीधर राव यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. ' आम्ही सर्वांचे आहोत आणि सर्वांचा विकास आणि विश्वासाला सोबत घेऊन वाटचाल करत आहोत. आता ब्राह्मण असोत की बनिया, की आदिवासी, हे सर्वजण भारताच्या विकासाचा अविभाज्य घटक बनले पाहिजेत. आम्ही कधीही भेदभाव केला नाही,' असे मुरलीधर राव यांनी म्हटले आहे. तसेच फाळणीचे राजकारण ही काँग्रेसची जुनी सवय आहे, त्यामुळे देशात काँग्रेसला उतरती कळा लागली आहे, अशा शब्दांत त्यांनी पलटवारही केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com