सरपंचपदाला पराभूत होऊनही उमेदवाराचा सत्कार; गावकऱ्यांनी दिली तब्बल ३१ लाखांची भेट

गावकऱ्यांनी दिलेल्या या पैशांमधून गावासाठीच काम करेल, असे आश्वासन सुभाष नंबरदार यांनी दिले आहे.
Subhash Nambardar
Subhash NambardarSarkarnama

Gram Panchaya Election : राज्यात नुकत्याच सात हजार ग्रामपंचायतीच्या निवडणुका (Gram Panchaya Election) झाल्या आहेत. या निवडणुकीमध्ये जिंकण्यासाठी उमेदवार जीवाचे राण करतात. निवडणुकीत वेगवेगळी आश्वासने देतात. अशाच एका ग्रामपंचायच्या निवडणुकीत उमेदवाराचा पराभव होऊनही गावकऱ्यांनी त्याचा जोरदार सत्कार केला आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीत पराभूत झालेल्या एका उमेदवारीचा गावकऱ्यांनी सत्कार केल्याची घटना हरियाणामध्ये (Haryana) घडली आहे. निवडणुकीमध्ये अपयश हाती येऊनही सत्कार झालेला या गावातील हा पहिलाच उमेदवार आहे. सत्कारासोबतच या गावकऱ्यांनी तब्बल ३१ लाख ३१ हजार रुपयांची रक्कम देखील या उमेदवाराला भेट म्हणून दिली. या घटनेची संपूर्ण देशात जोरदार चर्चा सुरु आहे.

Subhash Nambardar
मुख्यमंत्री शिंदेंनतर अब्दुल सत्तार अडचणीत; न्यायालयाचे कठोर ताशेरे : पुन्हा भूखंड घोटाळा?

हिसारमधील बुधा खेरा गावातील सरपंचपदाच्या निवडणुकीमध्ये उभ्या असलेल्या या पराभूत उमेदवाराचा गावकऱ्यांनी एकत्र येऊन सत्कार केला. सुभाष नंबरदार असे या उमेदवाराचे नाव आहे. निवडणूक प्रचारादरम्यान नंबरदार यांनी गावामध्ये बंधुभाव आणि एकोपा वाढावा यासाठी बरेच प्रयत्न केले होते. एकंरदितच त्यांनी गावासंदर्भात घेतलेल्या भूमिकेचा सत्कार करण्यात आला आहे, असे गावकरी सांगतात.

सरपंचपदाच्या निवडणुकीमध्ये सुभाष नंबरदार यांच्या विरोधात सुखविंदर बाधू हे उभे होते. त्यांनी १५७ मतांनी विजय मिळवला. तर नंबरदार यांना पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, सुभाष यांच्या पराभवानंतरही गावकऱ्यांनी एकत्र येत एका विशेष कार्यक्रमात त्यांचा सत्कार केला. गावाच्या भल्यासाठी सुभाष यांनी केलेल्या प्रयत्नांची जाण ठेऊन गावकऱ्यांनी त्यांच्यासाठी गोळा गेलेला निधी त्यांच्याकडे सुपूर्त केला.

या कार्यक्रमावेळी गावचे माजी सरपंच समशेर कारवासरा देखील उपस्थित होते. ते म्हणाले, त्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी आणि निवडणुकीत पराभूत झाले असले तरी ते आमचे हिरो आहेत. हे सांगण्यासाठी आम्ही या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. आम्ही त्यांना या पराभवाने खचून जाऊ नका असे कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला, असे समशेर यांनी स्पष्ट केले.

Subhash Nambardar
Devendra Fadanvis : 'शिंदे गटातील २० आमदार फोडून फडणवीस मुख्यमंत्री बनणार?'

या सत्कारावेळी नंबरदारांनी गावकऱ्यांचे आभार मानले. ते यावेळी म्हणाले, 'गावकऱ्यांनी माझ्याबद्दल दाखवलेल्या प्रेमासाठी मी सदैव त्यांचा ऋणी राहीन. मी विजयी उमेदवराशी कोणतेही मतभेद ठेवणार नाही. गावकऱ्यांनी दिलेल्या या पैशांमधून गावासाठीच काम करणार, असल्याचेही त्यांनी आश्वासन दिले. या पैशांमधून मी तरुणांना खेळाचे साहित्य आणि पुस्तकांचे वाटप करणार आहे. तसेच या पैशांमधून गावातील काही रस्त्यांची डागडुजीही करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com