मोदी सरकार लागले कामाला; भाजपच्या प्रदेशाध्यक्षांसह 10 नेत्यांची सुरक्षा वाढवली!

अग्निपथ योजनेवरून बिहारमध्ये मोठे आंदोलन सुरु आहे
bjp
bjpsarkarnama
Published on
Updated on

पाटणा : अग्निपथ योजनेवरून बिहारमध्ये जेडीयू (JDU) आणि भाजपमध्ये (BJP) सुरू असलेला वाद आता केंद्र सरकारपर्यंत (Central Government) पोहोचला आहे. यामुळेच केंद्र सरकारने बिहारच्या (Bihar) दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह एकूण 10 नेत्यांना Y स्तरावरील सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. यात बिहारच्या उपमुख्यमंत्री रेणू देवी, तारकेश्वर प्रसाद, भाजप अध्यक्ष संजय जयस्वाल, बिस्फीचे आमदार हरिभूषण ठाकूर, दरभंगाचे आमदार संजय सरावगी यांच्यासह अनेक नावांचा समावेश आहे.

केंद्रीय गुप्तचर यंत्रणांच्या अहवालाच्या आधारे गृह मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. ज्यात या सर्व नेत्यांना धमक्या येत असल्याचे म्हटले होते. गृह मंत्रालयाच्या या निर्णयानंतर सीआरपीएफने उपमुख्यमंत्र्यांसह सर्व नेत्यांना सुरक्षा पुरवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. बिहारमध्ये अग्निपथ योजनेवरून भाजप आणि जेडीयूमध्ये शाब्दिक युद्ध रंगले आहे. भाजपचे बिहारचे प्रदेशाध्यक्ष संजय जयस्वाल यांनी जेडीयूवर आरोप केले होते. त्यानंतर जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष लालन सिंह यांनी प्रत्युत्तर देत भाजपवर टीका केली होती.

bjp
मोठी बातमी : आमदार रवि राणांविरोधात अटक वॉरंट; विधान परिषद निवडणुकीपूर्वी भाजपला धक्का?

विशेष म्हणजे, बिहारमध्ये केंद्राच्या या योजनेला मोठा विरोध होत आहे. काही दिवसांपूर्वी या योजनेच्या विरोधात संतप्त झालेल्या युवकांनी उपमुख्यमंत्री रेणू देवी यांच्या बेतिया येथील निवासस्थानावर हल्ला केला होता. रेणू देवी यांच्याशिवाय बिहारमधील भाजप नेत्यांनाही तरुणांच्या विरोधाचा सामना करावा लागला आहे. या योजनेबाबत बिहारमधील बक्सर, समस्तीपूर, सुपौल, लखीसराय आणि मुंगेर आणि उत्तर प्रदेशातील बलिया, बनारस, चंदौली येथे आंदोलन हिंसक झाले आहे.

bjp
अग्नीपथवरुन एनडीएतच मतभेद; नितीशकुमार भाजपशी काडीमोड घेणार?

अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांनी गाड्यांची जाळपोळ केली, तसेच काही ठिकाणी रेल्वे स्थानकांची तोडफोड करण्यात आली. वाराणसीमध्ये अग्निपथ योजनेच्या निषेधार्थ अनेक तरुण रेल्वे ट्रॅकवर पुशअप करताना दिसले. बिहारच्या समस्तीपूरमध्ये जम्मू तवी-गुवाहाटी एक्स्प्रेस ट्रेनचे डबे पेटवून दिले. लखीसरायमध्येही जाळपोळ झाल्याची माहिती आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com