कुणामुळे भाजप खासदारांच्या मुलाबाळांना तिकीटे मिळाली नाहीत; खुद्द मोदींनीच सांगितले..

घराणेशाही असलेले पक्ष देशालाच पोखरून टाकत आहेत, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केली आहे.
PM Narendra Modi
PM Narendra ModiSarkarnama

नवी दिल्ली : आज झालेल्या भाजपच्या (BJP) संसदीय बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी घराणेशाही असलेले पक्षांवर जोरदार टीका केली. घराणेशाही असलेले पक्ष देशालाच पोखरून टाकत असल्याची टीका घराणेशाहीची पकड असणाऱ्या राजकीय पक्षांवर केली. ही टीका करत असतांना भाजपच्याही ज्या खासदारांच्या मुलाबाळांना तिकीटे मिळाली नाहीत ती माझ्यामुळेच मिळाली नाही हे देखील मोदींनी यावेळी स्पष्ट केले.

उत्तर प्रदेशासह चारही राज्यांत भाजपने सत्ता राखल्यावर आज झालेली ही पहिलीच भाजप संसदीय बैठक होती. या बैठकीला पक्षाचे बहुतांश खासदार उपस्थित होते. या ऐतिहासिक यशाचे शिल्पकार म्हणून पंतप्रधान मोदी यांचा यावेळी भव्य पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. गृहमंत्री अमित शहा, भाजपाध्यक्ष जे पी नड्डा, राजनाथसिंह, रस्ते व महामार्गमंत्री नितीन गडकरी, संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी, अल्पसंख्यांक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी, अर्थमंत्री निर्मला सीतारामन आदी सारे मंत्री बैठकीला हजर होते. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात ही बैठक झाली. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी घराणेशाहीवर जोरदार टीका केली आणि भाजपमधील नेत्यांच्या मुलांना कुणामुळे तिकीटे मिळाले नाही हे स्पष्ट करत भाजपमधील नेत्यांना एकप्रकारे इशाराही दीला आहे.

PM Narendra Modi
परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी सांगितली युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांची आपबीती...

राजकीय जाणकारांच्या मते उत्तर प्रदेशात रीता बहुगुणा जोशी यांनी आपली खासदारकी पणाला लावून व स्वामीप्रसाद मोर्य यांनी भाजपलाच सोडचिठ्ठी दिली तरी त्यांच्या व अनेक भाजप खासदारांच्या मुलामुलींना भाजपने अखेरपर्यंत तिकीट दिले नाही. राजकीय निरीक्षकांच्या मते घराणेशाहीचा टोकाचा तिटकारा करण्याची भाजप नेतृत्वाची भूमिका स्पष्ट आहे. पण दुसरीकडे संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांचे पुत्र पंकज उत्तर प्रदेशात मंत्री बनण्याच्या वाटेवर आहेत. हिमाचलातील भाजप नेते प्रेमकुमार धूमल यांचे पुत्र अनुराग ठाकूर केंद्रीय मंत्री आहेत. दिवंगत प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, बी एस येदियुरप्पा, यशवंत सिन्हा आदी कित्येक आजी-माजी भाजप नेत्यांची पुढची पिढी भाजपमध्येच सक्रिय आहे हेही वास्तव आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी घराणेशाहीवर आज पुन्हा जे टीकास्त्र सोडले त्याकडे पाहिले जाते.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत आपल्याला या घराणेबाज पक्षांच्या कारवायांना काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत उघडे पाडायचे आहे. घराणेशाहीमुळेच जातीयवाद वाढतो. हे पक्ष देशालाच पोखरतात, असे मोदींनी आपले मत मांडले आहे.

PM Narendra Modi
'भगतसिंह कोश्यारी हे राज्यपाल नसून 'भाजप'पाल झाले आहेत'

दरम्यान, युध्दग्रस्त युक्रेनमधून बहुतांश भारतीय विद्यार्थ्यांना सुखरूप परत आणण्याचे ऑपरेशन गंगा यशस्वीपणे राबविल्याबाबतच्या प्रतिक्रियांवर बोलताना मोदींनी जामनगरच्या राजाने दुसऱ्या माहयुध्दात पोलंडच्या लोकांना आश्रय दिला होता, त्याचे उदाहरण दिले. त्याच पोलंडच्या मार्गाने व त्या देशाच्या सहकार्याने युक्रेनमधून आमची मुले सुखरूप आली हा जामनगरच्या राजाने तेव्हा केलेल्या मदतीची परत-पावती होती, असेही निरीक्षण मोदींनी मांडले. तसेच, नुकत्याच प्रदर्शित झालेल्या बहुचर्चित 'द कश्मीर फाइल्स' चित्रपटाची मोदींनी मुक्तकंठाने प्रशंसा केली. असे चित्रपट वारंवार तयार व्हायला हवेत असेही त्यांनी नमूद केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com