नवी दिल्ली : कोरोना विषाणू (Cororna virus) महामारीच्या विळख्यातून जग काहीसे सावरु लागले असतानाच आता पुन्हा एकदा चीनमध्ये (China) कोरोना विषाणूने कहर मांडायला सुरुवात केली आहे. गेल्या दोन वर्षात चीनमध्ये जेवढे रुग्ण सापडत नव्हते, तेवढे दररोज सापडू लागले आहेत. त्यामुळे कोरोना विषाणूचा जगात पुन्हा प्रसार होणार अशी शक्यताही वर्तवण्यात येत आहे. असे असतानाच आता भारताने (India) कोरोना प्रतिबंधक उपायांची तयारी सुरु केली आहे. (The fourth wave of corona will come, the center warns the states)
केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी चीनमध्ये फैलावणाऱ्या कोरोना विषाणूच्या प्रसारावरुन राज्यांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत. देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य, आरोग्य सचिवांना पत्राद्वारे सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. चीनमधील कोरोनाच्या नवीन रुग्णांची संख्या चिंताजनक नाही, असा विचार करून कोणत्याही राज्य सरकारने निष्काळजीपणा करु नये. चाचणी, शोध, उपचार, लसीकरण आणि कोरोना प्रोटोकॉल या पंचसुत्रीचे काटेकोर पालन करावे, अशा सुचना देण्यात आल्या आल्या आहेत.
तसेच, चीनमध्ये फैलावणारा कोरोना विषाणूचा नवा प्रकार वेळेत शोधण्यासाठी INSACOG networkला पुरेशा प्रमाणात नमुने पाठवण्याचेही आदेश दिले आहेत. दरम्यान 'दक्षिण-पूर्व आशिया आणि युरोपमध्ये काही देशांमध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरीयंटचे नवे रुग्ण आढळून येत आहेत. याच पार्श्वभुमीवर राजेश भुषण यांनी 16 मार्चला एक उच्चस्तरीय बैठक घेत, सर्व राज्यांनी जीनोम सिक्वेन्सिंगवर जोरदारपणे काम करण्याची आणि कोविड-19 च्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
यासोबतच केंद्र सरकारने देशातील लोकांनाही सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. नागरिकांनी जबाबदारी लक्षात घेऊन कोरोना लस घ्यावी. मास्क लावावा, सार्वजनिक ठिकाणी किंवा गर्दीत एकमेकांपासून अंतर ठेवावे, स्वत:च्या वैयक्तिक स्वच्छतेकडे लक्ष द्यावे, असे आवाहन केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.