मी शरद पवारांच्या पाया पडलो पण माध्यमांसमोर त्यांना काय झालं!

'दि काश्मीर फाईल्स' चित्रपटावरून सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. देशातील सर्वच विरोधी पक्षांनी या चित्रपटाचा विरोध केला आहे.
Vivek Agnihotri, Sharad Pawar
Vivek Agnihotri, Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : 'दि काश्मीर फाईल्स' (The Kashmir Files) चित्रपटावरून सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. देशातील सर्वच भाजपविरोधी पक्षांनी या चित्रपटाचा विरोध केला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या वक्तव्यावरून तर आप (AAP) व भाजपमध्ये (BJP) जोरदार वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनीही या चित्रपटाला विरोध दर्शवला आहे. त्यावरून चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांनी ट्विट करत टीका केली आहे.

दिल्लीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) अल्पसंख्यांक विभागाच्या कार्यक्रमात बोलताना पवार यांनी गुरूवारी काश्मीर फाईल्स चित्रपटाच्या प्रदर्शनाला परवानगी देण्याची गरज नव्हती, असं वक्तव्य केलं आहे. अशा चित्रपटाचा आधार घेऊन देशातील वातावरण विषारी करण्याचा आरोप पवारांनी भाजपवर केला. देशातील सामाजिक सलोखा अबाधित राहावा, यासाठी प्रयत्न न करता उलट भाजपचे नेते लोकांना चित्रपट बघण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत, अशी टीकाही पवारांनी केली.

Vivek Agnihotri, Sharad Pawar
महाडिकांविषयी भाजपमध्ये नाराजी; 'स्त्रीने शत्रू तुडवला' म्हणत चित्रा वाघही भडकल्या

शरद पवारांचा चित्रपटाला विरोध असल्याचे समोर आल्यानंतर अग्निहोत्री यांनी याबाबत ट्विट करत टीका केली आहे. ते म्हणाले, मी शरद पवार आणि त्यांच्या पत्नी यांना काही दिवसांपूर्वी विमानात भेटलो होतो. त्यांच्या पायाही पडलो. त्यांनी मला व पल्लवी जोशीला चित्रपटासाठी आशीर्वाद दिले आणि अभिनंदनही केले. पण माध्यमांसमोर आल्यानंतर त्यांना काय झाले, माहित नाही. पण तरीही मी त्यांचा आदर करतो, असं अग्निहोत्री यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

चित्रपटावरून सुरू झालेल्या वादात पंडित जवाहरलाल नेहरू यांनाही ओढल्याबद्दल पवारांनी भाजपवरही टीका केली. काश्मिरी पंडित आणि मुल्सिमांवरील हल्ल्यांमागे दहशतवादी संघटना जबाबदार होत्या. पंडित नेहरू यांना काश्मीर प्रश्नाला जबाबदार धरणे योग्य नाही. काश्मीर पंडित बाहेर पडू लागले त्यावेळी व्ही. पी. सिंग पंतप्रधान होते. भाजपचा त्यांच्या सरकारला पाठिंबा होता. केंद्रीय गृहमंत्रिपदी मुफ्ती मोहम्मद सईद होते. त्यावेळी राज्यपाल असलेल्या जगमोहन यांनी भाजपच्या तिकिटावर दिल्लीत लोकसभेची निवडणूक लढवली होती, अशी टीका पवार यांनी भाजवर केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com