अयोध्येतील मशिदीचं नाव ठरलं; 'हे' असणार नाव

Ayodhya Mosque : मशिदीचे बांधकाम डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
Ayodhya Mosque Latest News
Ayodhya Mosque Latest NewsSarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अयोध्येत मुस्लिम पक्षाला दिलेल्या जमिनीवर मशिदीचे बांधकाम डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. मशीद बांधणाऱ्या इंडो-इस्लामिक कल्चरल फाउंडेशन ट्रस्टचे सचिव अतहर हुसैन यांनी आज (ता.१३ नोव्हेंबर) ही माहिती दिली. ही टाईमलाईन पाळली गेली तर अयोध्येतील भव्य राम मंदिराचे बांधकाम पूर्ण होण्याच्या सुमारासच मशिदीचे कामही पूर्ण होण्याचा योगायोग जुळून येईल.

दरम्यान, श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने म्हटले आहे की, अयोध्येतील रामजन्मभूमी येथे भव्य मंदिराचे बांधकाम डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण होईल. यावेळी मशिदीचे बांधकामही पूर्ण होण्याची शक्यता आहे. (Ayodhya Mosque Latest News)

Ayodhya Mosque Latest News
भाजपचे बंडखोर मोदी-शहांना आणणार अडचणीत; दिली 'ही' धमकी

रामजन्मभूमीवरील मंदिराचे बांधकाम डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण होईल आणि जानेवारी 2024 मध्ये मकर संक्रांतीनंतर मंदिरात औपचारिक दर्शन-पूजा सुरू केली जाईल, असे श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी मागच्याच महिन्यात सांगितले होते.

दीर्घकाळ चाललेल्या अयोध्या प्रकरणी निकाल देताना 9 नोव्हेंबर 2019 रोजी सर्वोच्च न्यायालयाने वादग्रस्त जागेवरील 2.77 एकर जमीन हिंदू पक्षाला मंदिर बांधण्यासाठी देण्याचे आदेश दिले होते. यासोबतच अयोध्येतच एका महत्त्वाच्या ठिकाणी मशीद बांधण्यासाठी मुस्लिमांना पाच एकर जमीन देण्याचा आदेश जारी करण्यात आला होता. न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत अयोध्या जिल्हा प्रशासनाने सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाला अयोध्येच्या सोहवाल तहसीलमधील धन्नीपूर गावात जमीन दिली होती.

मशिदीच्या बांधकामासाठी उत्तर प्रदेश सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाने इंडो-इस्लामिक कल्चरल फाउंडेशन ट्रस्टची स्थापना केली आहे. या जमिनीवर मशिदीसह हॉस्पिटल, कम्युनिटी किचन, लायब्ररी आणि संशोधन संस्था बांधण्याचा निर्णय या ट्रस्टने घेतला होता.

Ayodhya Mosque Latest News
Draupadi Murmu : राष्ट्रपतींचा अपमान करणाऱ्या तृणमूलच्या मंत्र्यांविरोधात भाजपनं उचललं मोठं पाऊल

हुसैन यांनी सांगितले की, 'या महिन्याच्या अखेरीस मशीद, रुग्णालय, कम्युनिटी किचन, वाचनालय आणि संशोधन केंद्राचा नकाशा अयोध्या विकास प्राधिकरणाकडून मिळण्याची आम्हाला आशा आहे. त्यानंतर लगेचच मशिदीच्या बांधकामाला सुरुवात केली जाईल.

फाऊंडेशनतर्फे मशिदीसह इतर गोष्टींचे बांधकाम सुरू केले जाणार असले तरी मशीदीचा आकार लहान असणार असल्याने तीचे बांधकाम लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे. या बांधकामासाठी कोणतीही कालमर्यादा निश्चित केलेली नसली तरी पुढील एका वर्षाच्या आत (डिसेंबर २०२३ पर्यंत) आम्ही मशिदीचे काम पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे.

हुसैन पुढे म्हणाले, मशीद आणि इतर सुविधांचे बांधकाम ट्रस्टने यापूर्वी जारी केलेल्या डिझाइननुसार केले जाईल. मशिदीचे नाव 'धन्नीपूर अयोध्या मशीद' असेल तर मशिदीचे संपूर्ण संकुल आणि इतर सर्व सुविधा महान स्वातंत्र्यसैनिक 'मौलवी अहमदउल्ला शाह कॉम्प्लेक्स' यांच्या नावाने ओळखल्या जातील.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com