महागाईचा कहर! मोदी सरकारनं घरगुती गॅसचे दर वाढवत पुन्हा दिला दणका

घरगुती गॅसचे दर या महिन्यात दुसऱ्यांदा वाढले आहेत.
PM Narendra Modi Latest Marathi News, LPG Price Hike Latest News
PM Narendra Modi Latest Marathi News, LPG Price Hike Latest NewsSarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली : आधीच महागाईने होरपळत असलेल्या सर्वसामान्यांना मोदी सरकारने पुन्हा दणका दिला आहे. मे महिन्यात दुसऱ्यांदा घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे. बारा दिवसांपूर्वी 50 रुपयांची दरवाढ करण्यात आली होती. तर गुरूवारी हे दर पुन्हा 3 रुपये 50 पैशांनी वाढवण्यात आले. तर व्यावसायिक सिलेंडरच्या दरात आठ रुपयांनी वाढ झाली आहे. (LPG Gas Cylinder Price Latest Marathi News)

मागील काही महिन्यांपासून एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. यापूर्वी एक मे रोजी व्यावसायिक वापराच्या 19 किलो एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात तब्बल 102.50 रुपयांची वाढ झाली होती. गुरूवारी पुन्हा आठ रुपयांनी हा सिलेंडर महागला. त्यामुळे हा सिलेंडर आता 2 हजार 363 रुपयांना मिळणार आहे. तर सात मे रोजी 14 किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरचे दर 50 रुपयांनी वाढवले होते. (The price of domestic LPG cylinder increased by Rs 3.5 with effect from today)

PM Narendra Modi Latest Marathi News, LPG Price Hike Latest News
राजकीय घडामोडींना वेग; संभाजीराजेंचं खुलं पत्र अन् उद्धव ठाकरेंचं अपक्ष आमदारांना बोलावणं

काही दिवसांपूर्वी देशातील अनेक शहरांतील घरगुती गॅस सिलेंडरच्या दराने हजारचा टप्पा ओलांडला आहे. आता त्यामध्ये गुरूवारी आणखी भर पडली आहे. गुरूवारी 3 रुपये 50 पैशांनी भाववाढ झाल्याने राजधानी दिल्लीसह मुंबईतील दर 1हजार 3 रुपयांवर पोहचले आहेत. तर कोलकाता शहरातील दर 1 हजार 29 आणि चेन्नईतील दर 1018.50 रुपयांवर गेले आहेत.

पेट्रोल-डिझेलच्या किंमती स्थिर :

गॅस सिलेंडर एका आठवड्यात दोनवेळा दणका दिला असतानाच पेट्रोल-डिझेलच्या किंमती मात्र मागील दीड महिन्यापासून स्थिर आहेत. इंधनाच्या दरात शेवटची वाढ सहा एप्रिल रोजी झाली होती. त्यापूर्वी साडेचार महिने स्थिर असलेल्या पेट्रोल (Petrol), डिझेलच्या (Diesel) दरवाढीला २२ मार्चपासून सुरुवात झाली होती आणि सहा एप्रिलपर्यंत दरात लिटरमागे दहा रुपयांपेक्षाही अधिक वाढ झाली होती.

मात्र त्यानंतर आतापर्यंत पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीला ब्रेक लागल्याचे पहायला मिळत आहे. आज जाहीर झालेल्या पेट्रोल, डिझेलच्या दरानुसार राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोल प्रति लिटर १०५.४१ रुपये तर डिझेल ९६.६७ रुपये लिटर आहे. तर देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये पेट्रोल प्रति लिटर १२०.५१ तर डिझेल १०४.७७ रुपये लिटर आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे भाव अनुक्रमे ११०.८५ व १००.९४ रुपये आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com