Jalandhar By Election: अरविंद केजरीवालांचा काँग्रेस-भाजपला दणका; लोकसभेच्या पोटनिवडणुकीत 'आप'चा दणदणीत विजय

Jalandhar By Election Result: आम आदमी पार्टीचे वर्चस्व वाढलं...
Jalandhar By Election
Jalandhar By ElectionSarkarnama

Punjab News : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचं चित्र जवळपास स्पष्ट झालं आहे. कर्नाटकात काँग्रेसला जवळपास 137 जागा मिळताना दिसत आहेत. तर भाजपला फक्त 63 जागा मिळताना दिसत आहे. त्यामुळे काँग्रेसचा सत्ता स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

दुसरीकडे पंजाबच्या जालंधर लोकसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत आम आदमी पार्टीचे सुशील रिंकू यांचा दणदणीत विजय झाला आहे. जालंधर लोकसभा मतदारसंघात भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारांचा 'आप'ने पराभव केला आहे.

Jalandhar By Election
Karnataka Election Result: कर्नाटकच्या जनतेला दिलेली पाच वचनं पहिल्या कॅबिनेटमध्ये पूर्ण करणार; राहुल गांधींची मोठी घोषणा

काँग्रेसचे दिवंगत खासदार संतोख सिंह चौधरी यांचं काही दिवसांपूर्वी निधन झालं होतं. त्यानंतर येथे पोटनिवडणूक जाहीर झाली होती. या निवडणुकीत काँग्रेसने संतोख सिंह चौधरी यांच्या पत्नी करमजीत कौर यांना उमेदवारी दिली होती. मात्र, त्यांचा पराभव झाला असून येथे आम आदमी पार्टीचे सुशील रिंकू विजयी झाले आहेत.

दरम्यान, या पोटनिवडणुकीत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी देखील सुशील रिंकू यांचा जोरदार प्रचार केला होता. या पोटनिवडणुकीत सुशील रिंकू हे विजयी झाल्यामुळे पंजाबमध्ये आम आदमी पार्टीचे वर्चस्व आणखी वाढलं आहे.

(Edited By : Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com