'कर्तव्यपथा'वरील ऐतिहासिक सोहळ्यात पुण्याच्या कलाकारांचा आवाज घुमणार

Kartavyapath : पंतप्रधान नरेंद्र मोदी व देशविदेशांतील मान्यवर उपस्थित असणार आहेत.
Pandit Suhas Vyas Latest News
Pandit Suhas Vyas Latest News Sarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीचे ‘हदय' असलेल्या राजपथाचे 'कर्तव्यपथ' (Kartavyapath) असे नामकरण आज (ता.८ ऑगस्ट) संध्याकाळी होईल तेव्हा या ऐतिहासिक सोहळ्यात एका देशभक्तीपर शास्त्रीय बंदिशीचेही सूर गुंजणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) व देशविदेशांतील मान्यवर यांच्या समोर ही बंदीश सादर करण्याचा मान पं. सुहास व्यास व पुण्यातील १८ कलाकारांना मिळणार आहे. विख्यात बंदीशकार पं. श्रीकृष्ण रातंजनकर उर्फ सुजान यांच्या लेखणीतून सुमारे पाऊणशे वर्षांपूर्वी या बंदीशीची निर्मिती झाली आहे. (Pandit Suhas Vyas Latest News)

Pandit Suhas Vyas Latest News
Big Mistake in Amit Shah's Tour : धक्कादायक ; अमित शाहांच्या दौऱ्यात मोठी चूक !

यानिमित्त पं. व्यास यांच्याशी संवाद साधला तेव्हा ‘देशभक्तीपर बंदिश दिल्लीत सादर करण्यास मिळणे हे आमचे भाग्य आहे,‘‘ अशी भावना त्यांनी व्यक्त केली. ‘गाऊ जस गान मंगल गाऊ, आनंद सो स्वातंत्र्य देवी, जय जय जय शब्ज जगाऊ, वंदे मातरम' असे या बंदिशीचे शब्द आहेत. मालकंस रागात बांधलेली ही बंदीश मध्य लय त्रितालात निबध्द आहे. तीन अंतरे असलेल्या या बंदिशीत पं. रातंजनकर यांनी भारतमातेच्या सौंदर्यस्थळांचे व जगात कोठेही नसतील असा वैशिष्ट्यांचे काव्यमय वर्णन केले आहे.

पं. व्यास यांनी अनेकदा ती गायिली आहे. यापूर्वी भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या वतीने (आयसीसीआर) ब्रिक्स संमेलनावेळी चीनमध्ये पं. व्यास यांचे गायन झाले होते. त्या प्रवासात त्यांनी आयसीसीआरचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्त्रबुध्दे यांना ही बंदीश गाऊन दाखविली तेव्हा त्यांना ती फार आवडली. त्यांनी इंदिरा गांधी कलाकेंद्राचे प्रमुख सच्चिदानंद जोशी यचा व पं. व्यास यांचा संपर्क साधून दिला. आठ दिवसांपूर्वी जोशी यांनी पं. व्यास यांच्याशी संपर्क साधला व राजपथ नामकरण व सेंट्रल व्हिस्टा ॲव्हेन्यू उद्घाटन सोहळ्यात पं. रातंजनकरांची ही बंदीश आपण कलकारांसह सादर करावी अशी इच्छा व्यक्त केली. पं. व्यास यांनी त्याला आनंदाने होकार दिला. ते व संगीत संयोजक आशिष केसकर कलाकारांसह काल दिल्लीत दाखल झाले. आजच्या सोहळ्या संगीत प्रकारातील हे एकमेव सादरीकरण असेल,असे केसकर यांनी सांगितले.

गांधीजींवरही शास्त्रीय बंदीश !

पं. रातंजनकर यांनी देशभक्तीपर अनेक बंदिशींची रचना केली आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यावरही त्यांनी बंदीशीची रचना केली आहे. गांधीजींवर निखळ अभिजात शास्त्रीय संगीतात बांधलेली कदाचित ती एकमेव बंदिश असावी.‘ गरज उठो त्रिभुवनमे पेसो, पावन नाम तुम्हारो मोहन..' असे शब्द असलेली ही बंदीश यमन रागात बांधली आहे. अनेक वर्षांपूर्वी फिल्मस डिव्हीजनला जेव्हा याबाबतची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी पं. व्यास यांच्याकडून ती बंदिश खास गाऊन घेऊन त्यावर खास लघुपटही बनवला होता. महात्मा गांधी यांच्या गांधी स्मृती या स्मृतीस्थळावर (३० जानेवारी मार्ग) दरवर्षी दोनदा होणाऱ्या संगीताच्या कार्यक्रमात ही बंदीश गाण्याची आपली इच्छा अद्याप पूर्ण व्हायची आहे, असेही पं. व्यासांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com