Rahul Gandhi's Disqualification As MP : कर्नाटकमधील कोलार येथे २०१४ मध्ये केलेल्या भाषणावरून सूरत न्यायालयाने गुरुवारी (ता. २३) काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर आज (ता. २४) लोकसभा अध्यक्षांनी राहुल गांधींची खासदारकी रद्द केली आहे. त्यानंतर देशातील काँग्रेस आक्रमक झाली आहे. राहुल गांधींवर कारवाई केल्याने सत्ताधाऱ्यांना संकट कमी झाले, असे वाटत असेल, मात्र त्यांच्यावरील संकट वाढणार आहे, असा इशारा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांनी भाजपवर निशाणा साधला. भाजप खरे बोलणाऱ्यांचे तोंड दाबत असल्याचा आरोप खरगे यांनी केला आहे. ते म्हणाले, "राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची खासदारकी रद्द करण्याचे प्रयत्न सुरू होते. भाजप खरे बोलणाऱ्यांवर, लोकशाहीची रक्षा करणाऱ्यांवर, लोकांची बाजू जोमाने मांडणाऱ्यांचे तोंड बंद करण्याचे कायम प्रयत्न करत आले आहे."
खरगे यांंनी नीरव मोदी आणि ललीत मोदींबाबत काही प्रश्न उपस्थित केले. तसेच शेवटपर्यंत लोकशाही वाचविण्यासाठी लढत राहणार, असा इशाराही दिला. ते म्हणाले "राहुलजींनी असे कोणते वाक्य केले की मागासवर्गीयांची मानहानी झाली. देशाचा पैशा घेऊन पळणारे निरव मोदी, ललीत मोदी, मल्ल्या ही लोक मागासवर्गीय आहेत का? त्यांच्यावरच गांधींजी बोलले आहेत. राहुल गांधी मगासवर्गीय लोकांविरोधात बोलतात अशी वातावरण निर्मिती केली जात आहे. या कारवाईतून त्यांना वाटत असेल की त्यांचे संकट कमी झाले आहे. मात्र त्यांचे पितळ कायम उघडे पाडत राहू. आमचा संघर्ष कायम असणार आहे. लोकशाहीच्या संरक्षणासाठी तुरुंगात जाण्याची वेळ आली तरी आम्ही जाणार आहोत."
महाराष्ट्रातील काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Pruthwiraj Chavan) यांनीही भाजपवर टीका केली आहे. या कारवाईमुळे नरेंद्र मोदी (Narendra Modi), भाजप किती घाबरले आहेत हे दिसून येत आहे. भाजपने राहुल गांधी यांच्यावर फक्त सुडाच्या राजकारणातून कारवाई केल्याचा आरोप चव्हाण यांनी केला आहे.
चव्हाण म्हणाले, "भाजपच कायम सुडाचे राजकारण करीत आले आहे. राहुल गांधींवरील कारवाईही त्याचेच एक उदाहण आहे. ही कारवाई करून देशात अघोषित आणीबाणी आणायचा प्रयत्न केला आहे. भारत जोडो यात्रेनंतर राहुल गांधींना, काँग्रेसला देशात प्रतिसाद वाढत असल्याचे दिसून आले. तसेच महागाई, बरोजगारीमुळे मोंदीवरोधात वातावरण निर्मिती होत आहे. संसदेतील गांधींचा आवाज बंद करण्यासाठी ही शिक्षा झाली आहे."
चव्हाण यांनी या कारवाईचा आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या केंब्रीज विद्यापीठातील वक्तव्यांचा काहीही संबंध नसल्याचेही स्पष्ट केले. चव्हाण म्हणाले, "राहुलजींनी देशाबाहेर केलेल्या विधानांचा आता काही संबंध नाही. त्या देशात फ्रीडम ऑफ स्पीच आहे. त्यांना आपल्या देशातील परिस्थिती सांगण्यासाठीच बोलाविले होते. तेथे ते खोटी स्थिती कशी सांगतील. असे असेल तर नरेंद्र मोदींनी चीनमध्ये भारताबद्दल जे वक्तव्य केले होते, त्याबद्दल त्यांच्यावर काय कारवाई करणार. केंब्रीजमध्ये काय बोलले याचा काही संबंध नाही. त्यांची खासदारकी रद्द करण्याचा भाजपचा प्रयत्न अनेक वर्षांपासूनचा आहे. त्याच अनुषंगाने कर्नाटकमधील जुने भाषण उकरून काढून ही कारवाई केली आहे."
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.