Pulwama Attack: तर पुलवामा हल्ला झालाच नसता; सत्यपाल मलिकांनी सांगितलं तेव्हा काय घडलं...

Satyapal Malik's Secret Explodes पुलवामा हल्ल्याबाबत जम्मू-कश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केंद्रातील मोदी सरकारवर धक्कादायक आरोप केले आहेत.
Pulwama Attack:
Pulwama Attack: Sarkarnama
Published on
Updated on

Satyapal Malik on Pulwama Attack : जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांबाबत मोठा खुलासा केला आहे.केंद्रातील मोदी सरकारच्या निष्काळजीपणामुळेच पुलवामा हल्ला झाल्याचा आरोप सत्यपाल मलिक यांनी केला आहे. धक्कादायक म्हणजे खुद्द पंतप्रधान मोदींनीच (Narendra Modi) आपल्याला या संपूर्ण प्रकरणात मौन बाळगण्याचा सल्ला होता, असंही मलिक यांनी म्हटलं आहे. (Then the Pulwama attack would not have happened; What happened when Satyapal Malik told)

सत्यपाल मलिक यांनी द वायरला दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे.सीआरपीएफचा ताफा घेऊन जाण्यासाठी गृह मंत्रालयाकडे पाच विमानांची मागणी केली होती. परंतु गृह मंत्रालयाने सीआरपीएफला विमान देण्यास मान्यता दिली नाही. विमान दिले असते तर हा हल्ला झालाच नसता. हल्ल्याच्या संध्याकाळीच आपण पंतप्रधान मोदींना आपल्यामुळे जवानांचे प्राण गमावले, असे म्हटलं. पण यावर पंतप्रधानांनी आपल्याला शांत राहण्याचा सल्ला दिला. असही मलिक यांनी यावेळी सांगितल. ( National Political News)

Pulwama Attack:
BRS News : मोदींना शह देण्यासाठी विरोधक मोट बांधत असतानाच KCR यांचा मोठा दावा ; म्हणाले, 'केंद्रात पुढील सरकार... '

सत्यपाल मलिक म्हणाले की, सीआरपीएफच्या जवानांवर हल्ला झाला त्या दिवशी पंतप्रधान जिम कॉर्बेट पार्कमध्ये शूटिंग करत होते.पंतप्रधान मोदींना या हल्ल्याची माहिती मिळताच त्यांनी संपर्क साधला. आपण संपूर्ण हकीकत पंतप्रधानांना सांगितली. मात्र,पंतप्रधानांनी पुलवामात घडलेला हा प्रकार पुढे कोणालाही सांगण्यास नकार दिला.

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल (Ajit Dowal) यांनाही घडलेला प्रकार सांगितला. पण डोवाल यांनीही त्यांना गप्प राहण्यास सांगितले.माझ्या अधिकारात असते तर मीच जवानांसाठी सीआरपीएफला विमाने उपलब्ध करून दिली, असंही मलिक यांनी म्हटलं आहे. (BJP Election Politics)

दरम्यान, या सर्व खुलाशांवर ,पंतप्रधान मोदींनी गप्प राहण्याचा सल्ला दिला होता का?याचाच अर्थ पुलवामा हल्ल्याचा निवडणुकीत फायदा उठवण्याचा प्रयत्न झाला का, असा प्रश्न केला.त्यावर, सत्यपाल मलिक यांनी होकार देत सहमती दर्शवली. धक्कादायक म्हणजे या गोष्टी पुढे न कळल्यामुळे केंद्रसरकारचे अत्यंत दुर्लक्ष झाले. या घटनेचा सर्व दोष पाकिस्तानवर टाकून मोदी सरकार आपल्या जबाबदारीतून मुक्त झाले, असा आरोपही त्यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com