Karnataka Election Result 2023 Live : एचडी कुमारस्वामींशी काँग्रेस आणि भाजपने संपर्क साधला? कर्नाटकमध्ये काँग्रेस बहुमताच्या जवळ

Karnataka Elections : कर्नाटकमध्ये काँग्रेस स्पष्ट बहुताकडे वाटचाल करत आहे.
D. K. Sivakumar, Basavaraj Bommai, SD Kumaraswamy
D. K. Sivakumar, Basavaraj Bommai, SD KumaraswamySarkarnama
Published on
Updated on

Karnataka Assembly Elections Result : कर्नाटक (Karnataka) निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे अवध्या देशाचे लक्ष लागले आहे. आतापर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार काँग्रेस बहुमताच्या पार आहे. काँग्रेसला ११५ जागा मिळताना दिसत आहेत. तर भाजप ७८ जगांवर आघाडीवर आहे. जेडीएस २६ जागांवर आघाडीवर आहे.

मात्र, हे आकडे पुढे असेच राहणार की बदलणार याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. कारण त्रिशंकू परिस्थिती झाली तर जेडीएस आपल्या सोबत असावी यासाठी दोन्ही पक्षांकडून त्यांशी संपर्क करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

D. K. Sivakumar, Basavaraj Bommai, SD Kumaraswamy
Karnataka Election Result 2023: माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांचा पराभव

एचडी कुमारस्वामी यांच्या जनता दल सेक्युलरने आज सांगितले की, त्यांना काँग्रेस (Congress) आणि भाजप (BJP) या दोन्हींकडून (युतीचे) संकेत मिळत आहेत. ज्येष्ठ जेडी(एस) नेते तनवीर अहमद यांनी सांगितले की "निर्णय घेण्यात आला आहे. योग्य वेळ आल्यावर आम्ही ते जनतेसमोर जाहीर करू. तन्वीर अहमद म्हणाले, होय, (भाजप आणि काँग्रेस) दोघांनीही आमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आहे.

जेडीएस (JDS) आज अशा स्थितीत आहे की पक्षांना आज आमच्याशी संपर्क साधायचा आहे." राज्याच्या भल्यासाठी आपण दोन्ही राष्ट्रीय पक्षांवर लक्ष ठेवावे अशी कर्नाटकच्या जनतेची इच्छा आहे. आणि प्रादेशिक पक्षांना कर्नाटकच्या विकासासाठी काम करण्याची इच्छा नसण्याचे कोणतेही कारण मला दिसत नाही. पक्ष किती जागा जिंकेल, असे विचारले असता, अहमद म्हणाले, "आमच्याशिवाय कोणीही सरकार स्थापन करू शकत नाही. मला वाटते की ही संख्या चांगली असेल.

D. K. Sivakumar, Basavaraj Bommai, SD Kumaraswamy
Karanataka Election Result : काँग्रेस ११० जागांवर आघाडीवर भाजपची पिछेहाट; कुमारस्वामी किंगमेकरच्या भूमिकेत?

दरम्यान, काँग्रेस बहुमताकडे वाटचाल करत आहे. निवडून आलेल्या आमदारांची फोडाफोडी होऊ नये याची पुरेशी काळजी काँग्रेसकडून घेण्यात येत आहे. निवडून आलेल्या सर्वच आमदारांना बंगलोरकडे रवाना करण्यात येणार असून तिथून जयपूरला हलवले जाण्याची शक्यता, काँग्रेसच्या सूत्राने व्यक्त केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com