Karnataka Cabinet Expansion : मंत्रिमंडळ विस्तार होताच काँग्रेसमध्ये असंतोष; मुख्यमंत्री म्हणतात...

Siddaramaiah News : मंत्रिमंडळाच्या विस्तारावरून काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे.
Siddaramaiah
SiddaramaiahSarkarnama
Published on
Updated on

Karnataka Cabinet Expansion News : कर्नाटमध्ये (Karnataka) मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. मंत्रिमंडळाच्या विस्तारावरून काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. त्यामुळे काँग्रेसमधील आमदारांत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. मात्र, कुणीही जाहीर वक्तव्य करण्याचे धाडस केलेले नाही. तरीही काही आमदारांत नाराजी असल्याच्या वृत्ताला पक्षश्रेष्ठींनी दुजोरा दिला.

गांधी परिवाराचे निष्ठावंत बी. के. हरिप्रसाद यांना पक्षाने मंत्रिपद नाकारल्यानंतर ते विधान परिषद सदस्यत्व आणि परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देण्याचा विचार करत असल्याचे समजते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आर. व्ही. देशपांडे यांनी विधानसभा अध्यक्षपद स्वीकारण्यास नकार दिल्यानंतर त्यांना मंत्रिपद मिळालेले नाही.

Siddaramaiah
Balasaheb Thorat News : काँग्रेस विधानसभेत नवीन गटनेता नेमणार? बाळासाहेब थोरात जबाबदारीतून...

नवी दिल्लीतील त्यांच्या लॉबिंगचा काही उपयोग झाला नाही. राज्य शाखेचा आरोप आहे की, देशपांडे यांनी पक्ष अडचणीत असताना सहकार्य केलेले नाही. माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या विरोधात बंडाचा झेंडा फडकावून काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या शिवलिंगेगौडा यांनाही मंत्रीपद मिळालेले नाही. ते म्हणाले, दु:खी आहे पण मी आता काहीही बोलणार नाही.

ज्येष्ठ राजकारणी टी. बी. जयचंद्र, मतदारसंघात न येता धारवाड ग्रामीण भागातून विजयी झालेले विनय कुलकर्णीही नाराज आहेत. कुलकर्णी हे भाजप (BJP) कार्यकर्त्याच्या खून प्रकरणातील संशयित आरोपी आहेत. त्यांना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या गोटातील आमदार म्हणून ओळखले जाते. भाजपकडून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले परंतु निवडणुकीत पराभूत झालेले जगदीश शेट्टर आणि लक्ष्मण सवदी यांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही.

Siddaramaiah
Karnataka cabinet expansion News : कर्नाटकात काँग्रेसने असे राखले जातीय अन् प्रादेशिक समीकरण; लोकसभेच्या 20 जागांचे लक्ष्य

सवदी यांना नंतरच्या टप्प्यात कॅबिनेट मंत्रिपद देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. तर जगदीश शेट्टर यांना विधान परिषदेवर घेत नंतर मंत्रिमंडळात घेण्याचे आश्वासन दिल्याचे सांगण्यात येत आहे. ज्येष्ठ नेते रुद्राप्पा लमाणी यांचाही मंत्रिमंडळात समावेश नाही. बंजारा समाजाचे नेते लमाणी यांचे नाव शुक्रवारी रात्रीपर्यंत यादीत होते. मात्र, आज त्यांचे नाव यादीत नाही. निवडणुकीत समाजातील ७५ टक्के नागरिकांनी काँग्रेसला (Congress) मतदान केले. आमच्या समाजातील एका तरी नेत्याला मंत्रिपद मिळाले पाहिजे, अशी जोरदार मागणी होत आहे.

कोणीही नाराज नाही : मुख्यमंत्री

शनिवारी प्रसारमाध्यमांना उत्तर देताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या (Siddaramaiah) यांनी मात्र 'मंत्रिमंडळ विस्ताराबाबत नाराजी असल्याची तुमच्याकडे कोणत्या नेत्याने वैयक्तिकरित्या तक्रार केली आहे का? असा प्रश्न करून कोणताही आमदार नाराज असल्याचे माझ्यापर्यंत आलेले नाही, असे स्पष्ट केले.

Edited by : Amol Jaybhaye

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com