Arvind Kejriwal News: 'इंडिया' आघाडीत पंतप्रधानपदाच्या शर्यतीत 'हे' तीन चेहरे? केजरीवालांची तडकाफडकी माघार...

INDIA Alliance Prime Minister Face : इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदासाठी तीन नावे चर्चेत...
Arvind Kejriwal News
Arvind Kejriwal NewsSarkarnama

Delhi News: आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देशपातळीवर मोदी सरकारविरोधात 'इंडिया' आघाडी उघडली आहे. या आघाडीकडून केंद्रातील मोदी सरकाविरोधात रान उठवले जात आहे. पण अद्यापही इंडिया आघाडीचा पंतप्रधानपदाचा चेहरा ठरलेला नाही. ‘इंडिया’आघाडीकडून पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण असेल? याविषयी तर्क-वितर्क लढवले जात आहेत.

पंतप्रधानपदाच्या मुद्द्यावरुन भाजपकडून विरोधीपक्षांच्या आघाडीवर वारंवार सडकून टीका केली जात आहे. मात्र, आता इंडियाच्या मुंबईतील बैठकीपूर्वीच पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचं नाव पुढे आले होते. 'आप'कडून इंडिया आघाडीकडून केजरीवाल हे पंतप्रधानपदाचे उमेदवार व्हावे अशी इच्छा व्यक्त करण्यात आली होती.

Arvind Kejriwal News
Uddhav Thackeray News : प्रकाश आंबेडकरांना 'मविआ' अन् 'इंडिया' आघाडीची दारं उघडली ! उध्दव ठाकरेंचं पवारांसमोरच मोठं विधान

इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदासाठी तीन नावे चर्चेत आले आहेत. यामध्ये आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते उद्धव ठाकरे आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांची नावे चर्चेत आहेत. पण आता 'आप'कडून केजरीवाल पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.

आम आदमी पक्षाकडून अरविंद केजरीवाल(Arvind Kejariwal) हे पंतप्रधानपदाचे उमेदवार व्हावे, अशी इच्छा व्यक्त करण्यात आली होती. 'आप'च्या प्रवक्त्या प्रियांका कक्कड यांनी केजरीवाल हे पंतप्रधानपदाचे दावेदार असावे, असं म्हटलं होतं. यावर आपच्या नेत्या आतिशी मार्लेना यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट करताना केजरीवाल पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नसल्याचं म्हटलं आहे.

Arvind Kejriwal News
Ahmednagar Crime News: हरेगाव दलित युवकांना मारहाण प्रकरणी आंबेडकर - आठवले एकाच दिवशी घेणार पीडित कुटुंबियांची भेट

पंतप्रधानपदासाठी समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांचे नाव देखील आघाडीवर असल्याची चर्चा आहे. समाजवादी पक्षाच्या नेत्या जुही सिंह यांनी म्हणाल्या, विरोधकांच्या आघाडीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार अखिलेश यादव हे असावेत. सपाचा प्रत्येक कार्यकर्ता त्यांना पंतप्रधानपदी पाहतो. त्यांच्याकडे पंतप्रधानपदाच्या सर्व क्षमता असल्याचंही त्यांनी सांगितल्या.

पंतप्रधानपदाबाबत ठाकरे काय म्हणाले..?

ठाकरे गटाच्या नेत्यांकडून इंडिया आघाडीकडून उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray)पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित करावा अशी मागणी केली जात आहे. यावर स्वत: उद्धव ठाकरे यांनी मिश्किल टिप्पणी केली आहे. ठाकरेंना पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित करावा, या ठाकरे गटाच्या मागणीबाबत त्यांना प्रश्न विचारताच ते म्हणाले, “होय बरोबर आहे, मी उद्या जातो आणि पंतप्रधानपदाची शपथ घेतो.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com