Lok Sabha Election 2024 Third Front:भाजपच्या विजयी रथाला रोखण्यासाठी तिसरी आघाडी स्थापन होत आहे. BJD-DMK सुद्धा या तिसऱ्या आघाडीत समाविष्ट होण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. त्यामुळे काँग्रेसचे टेन्शन वाढलं आहे. सध्या आठ पक्ष या तिसऱ्या आघाडीत समाविष्ट होत आहेत.
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतली आहे. ममता बॅनर्जी या ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचीही भेट घेणार आहेत. तिसरी आघाडी मजबूत बनविण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु आहेत. काँग्रेसला विरोधी पक्षाचा प्रमुख म्हणून हटविण्यासाठी हे सगळे प्रयत्न सुरु आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु आहे. मोदी सरकारला हटविण्यासाठी विरोधक एकत्र येत आहेत, पण त्यांनी काँग्रेसला सोबत घेण्यास नकार दिला आहे.
विरोधी पक्षातील घटक पक्ष हे काँग्रेसकडे नेतृत्व देण्यास तयार नाही. त्यासाठी तिसरी आघाडी स्थापन करण्याच्या हालचाली सुरु आहेत. आत्तापर्यंत आठ प्रमुख पक्षांनी तिसऱ्या आघाडीत सहभागी होण्यास मान्यता दिली आहे. यात आणखी काही पक्ष सामील होण्याची शक्यता आहे.
अखिलेश यादव यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेऊन काँग्रेसशिवाय तिसरी आघाडी स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. भाजपला टक्कर देण्यासाठी विरोधकांची मोट बांधण्याचा प्रयत्न यानिमित्ताने होत आहे.
डीएमके सुद्धा या तिसऱ्या आघाडीत समावेश होण्याची शक्यता आहे. आपचे नेते, मनीष सिसोदिया यांना अटक झाल्यानंतर विरोधीपक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून तपास यंत्रणांचा गैरउपयोग होत असल्याचा आरोप केला आहे. यात आठ पक्ष एकत्र आले आहेत.
आम आदमी पक्ष, टीएमसी, बीआरएस, आरजेडी, सपा, एनसीपी, नॅशनल कॉन्फ्रेंस, शिवसेना (ठाकरे गट) हे आठ पक्ष तिसऱ्या आघाडीत येत आहेत.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी, तेलंगनाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव, बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, सपाचे प्रमुख, माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव, एनसीपीचे अध्यक्ष शरद पवार, नँशनल कॉन्फ्रेंसचे फारूक अब्दुल्ला, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे एकत्र येऊन तिसरी आघाडी स्थापन करणात आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.