Third Front without Congress: आगामी निवडणुकीसाठी काँग्रेसशिवाय तिसरी आघाडी ; ममता बँनर्जी, अखिलेश यादव..

Third Front without Congress opposition is all set to sideline congress in 2024 :
Mamata Banerjee
Mamata Banerjeesarkarnama
Published on
Updated on

Third Front without Congress opposition is all set to sideline congress in 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांची जोरदार तयारी सुरु आहे. विरोधीपक्ष यासाठी विशेष तयारी करीत आहे. पुन्हा एकदा तिसरी आघाडीसाठी विरोधक एकत्र येण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.

काँग्रेसला सोडून तिसऱ्या आघाडीची तयारी विरोधी पक्ष करीत आहेत. तीन प्रमुख पक्ष यासाठी एकत्र येत आहे. सत्तेपासून भाजप आणि काँग्रेसला कसे दूर ठेवता येईल, यासाठी त्यांनी रणनीती आखली आहे.

तिसऱ्या आघाडीसाठी समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांची भेट घेतली. तर पुढील आठवड्यात ममता बॅनर्जी ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची भेट घेणार आहेत.

Mamata Banerjee
BJP News : चित्रा वाघांच्या अडचणी वाढल्या ; न्यायालयाचा दणका, राष्ट्रवादीच्या नेत्याने..

भाजप काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना विरोधीपक्षाचा चेहरा समजते. त्यामुळे अन्य पक्षावर भाजप निशाना साधत आहेत. त्यामुळे अन्य विरोधी पक्षांनी काँग्रेसशिवाय तिसरी आघाडी स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

लंडन येथे भारताविषयी राहुल गांधी यांनी केलेल्या विधानावरुन भाजप नेते संतापले आहेत.राहुल गांधी यांनी माफी मागावी, अशी मागणी भाजपने केली आहे. अशा परिस्थितीत आता विरोधी अन्य पक्ष काँग्रेसपासून अंतर ठेवून आहेत.

Mamata Banerjee
Congress News: नेहरुंचा अपमान करणे मोदींना महागात पडणार ?; काँग्रेसने उचलले मोठं पाऊल

"राहुल गांधी यांनी केलेल्या विधानावरुन भाजपला सभागृहाचे कामकाज बंद करायचे आहे, यासाठी ते राहुल गांधींच्या माफीची मागणी करीत आहे. विरोधीपक्षाचा चेहरा राहुल गांधी आहेत, असे भासवून भाजपला त्यांचा फायदा होत आहे. आता पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण आहे, याचा विचार करणे चुकीचे आहे. विरोधीपक्षामध्ये काँग्रेस हा बिग बॉस नाही," असे टीएमसीचे खासदार सुदीप बंदोपाध्याय यांनी सांगितले.

ममता बॅनर्जी या २३ मार्च रोजी नवीन पटनायक यांची भेट घेणार आहे. या बैठकीत काँग्रेसला दूर ठेवण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. "आम्ही ममता बँनर्जी यांच्यासोबत आहोत," असे अखिलेश यादव यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com