Nitin Gadkari Threat Case : नितीन गडकरींना धमकी : नागपूरच्या पोलिस पथकाकडून बेळगावमधील कारागृहात चौकशी

केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या कार्यालयाशी १४ जानेवारी २०२३ रोजीही संपर्क साधत खंडणीसाठी धमकाविले होते. त्याची चौकशी सुरु असताना नव्याने कॉल गेल्यामुळे खळबळ उडाली आहे.
Nitin Gadkari Threat Case
Nitin Gadkari Threat CaseSarkarnama

बेळगाव : नागपूरमधील केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधून खंडणीची मागणी केल्याच्या आरोपाखाली नागपूर पोलिसांचे दोन सदस्यीय पथकातर्फे बेळगावमधील हिंडलगा कारागृहातील कैद्यांची चौकशी करण्यात आली. मोबाईलचा तपास घेत कैद्यांकडून नागपूर पोलिसांनी विविध स्वरुपाची माहिती घेतली आहे. (Threat to Nitin Gadkari: Interrogation by Nagpur police team in Belgaum jail)

हिंडलगा कारागृहामधील जयेश या नावाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर येथील कार्यालयाशी संपर्क साधण्यात आला होता. कार्यालयातील अधिकाऱ्यांकडे १० कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. त्याची चौकशी नागपूरच्या पथकाकडून करण्यात आली आहे. नागपूर येथील पोलिसांचे हे दोन सदस्यांचे पथक गुरुवारी (ता. २३) रात्री उशिरा बेळगावमध्ये दाखल झाले होते. शुक्रवारी त्यांनी कारागृहामधील कैद्यांकडे चौकशी केली. त्यानंतर पोलिसांचे हे पथक पुन्हा नागपूरला परतले आहे.

केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या कार्यालयाशी १४ जानेवारी २०२३ रोजीही संपर्क साधत खंडणीसाठी धमकाविले होते. त्याची चौकशी सुरु असताना नव्याने कॉल गेल्यामुळे खळबळ उडाली आहे. यापूर्वी कारागृहात कैद्याची चौकशी आणि शोधमोहीम कोल्हापूर आणि नागपूर पोलिसांनी राबविली आहे. या कारवाईमध्ये स्थानिक पोलिसही सहभागी झाले होते.

जयेश नावाच्या कैद्याची केली चौकशी

नागपूर पोलिसांचे पथक गुरुवारी सायंकाळी बेळगावात दाखल झाले होते. त्यांच्यासह कारागृह अधिकारी आणि पोलिसांचे पथक होते. या दरम्यान जयेश नामक कैद्याची कसून चौकशी करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. चौकशीनंतर नागपूर पोलिसांचे पथक पुन्हा नागपूरमध्ये दाखल झाले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com