भाजपच्या उपाध्यक्षांवर हल्ला; सुरक्षारक्षकांनी पिस्तूल रोखूनही जमाव आक्रमक

आक्रमक जमावाला पांगवण्यासाठी सुरक्षारक्षकांना पिस्तूल रोखावे लागले. या घटनेचा एक व्हिडीओ समोर आला आहे.
Dilip Ghosh, West Bengal
Dilip Ghosh, West BengalSarkarnama

कोलकता : पश्चिम बंगालमधील तीन विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा सोमवारी शेवटचा दिवस आहे. मागील काही दिवसांपासून शांततेत सुरू असलेल्या प्रचाराला अखेरच्या दिवशी गालबोट लागले. भवानीपूर मतदारसंघात प्रचारासाठी गेलेले भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दिलीप घोष यांच्यावर स्थानिक नागरिकांना हल्ला केला. आक्रमक जमावाला पांगवण्यासाठी घोष यांच्या सुरक्षारक्षकांना पिस्तूल रोखावे लागले. पण त्यानंतरही जमाव मागे हटत नव्हता. या घटनेचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

भवानीपूर मतदारसंघात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तृणमूल काँग्रेसच्या उमेदवार आहेत. नंदीग्राम मतदारसंघात पराभव झाल्याने मुख्यमंत्रिपद टिकवण्यासाठी त्यांना ही निवडणूक जिंकावीच लागणार आहे. भाजपनं प्रियांका टिबरेवाल यांना उमेदवारी दिली आहे. सोमवारी प्रचाराच्या अखेरच्या दिवशी भाजपकडून 40 नेत्यांना 40 ठिकाणी प्रचारात उतरवण्यात आलं आहे.

Dilip Ghosh, West Bengal
काँग्रेसला मोठा धक्का; माजी मुख्यमंत्री पक्षाला ठोकणार रामराम

दिलीप घोष हे भवानीपूरमधील जाडू बाबूर बाजार भागात प्रचार करत होते. यावेळी त्यांना परत जाण्यास सांगत एका जमावानं त्यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला. सुरक्षारक्षकांनी घोष यांच्याभोवती कडं केलं. पण त्यानंतर आक्रमक झालेला जमावाने सुरक्षारक्षकांनाही धक्काबुक्की केली. यादरम्यान घोष यांनाही धक्काबुक्की झाल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. त्यामुळे सुरक्षारक्षकांना पिस्तूल काढावे लागले. सुरक्षारक्षाकंनी पिस्तूल रोखल्यानंतरही जमाव शांत झाला नाही.

जमाव शांत होत नसल्याचे पाहून घोष यांनी कार्यकर्त्यांसह तिथून काढता पाय घेतला. रम्यान, घोष यांनी हा आपली हत्या करण्याचा पूर्वनियोजित कट असल्याचा आरोप केला आहे. तृणमूलच्या गुंडांनी हे षडयंत्र रचलं होतं. सत्ताधारी पक्षाचं हे वागणं अत्यंत निंदनीय आहे. अशा स्थितीत योग्यप्रकारे निवडणूक पार पडू शकते का, असा सवाल घोष यांनी उपस्थित केला आहे. भवानीपूरमध्ये लोकप्रतिनिधींवरच हल्ला होत असेल तर येतील लोकांचं आयुष्य किती सुरक्षित आहे, अशी टीकाही घोष यांनी केली आहे.

दरम्यान, भवानीपूरमध्ये 30 तारखेला मतदान होणार आहे. या मतदारसंघातून ममता बॅनर्जी या 2011 आणि 2016 मध्ये विजयी झाल्या होत्या. यावर्षी एप्रिल-मे महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी आपला पारंपरिक मतदारसंघ सोडून नंदीग्राममधून निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. विधानसभेतील विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी त्यांचा पराभव केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com