Triple Engine Government Delhi : दिल्लीत आता ‘ट्रिपल इंजन सरकार’ भाजपचाच महापौर ; काँग्रेसला निवडणुकीत अवघी आठ मतं!

Delhi Mayor Election Result Update : दिल्लीचे उपमहापौरपदही भाजपने मिळवले आहे, तर या निवडणुकीवर आम आदमी पार्टीे आधीच बहिष्कार टाकलेला होता.
Raja Iqbal Singh elected as Mayor of Delhi in the Triple Engine Government, marking a significant victory for BJP over Congress
Raja Iqbal Singh elected as Mayor of Delhi in the Triple Engine Government, marking a significant victory for BJP over CongressSarkarnama
Published on
Updated on

BJP's Stronghold: Raja Iqbal Singh Elected Mayor : राष्ट्रीय राजधानी दिल्लीत आता शुक्रवारपासून ट्रिपल इंजन सरकारची सुरुवात झाली आहे. भारतीय जनता पार्टीचे नेते राजा इकबाल सिंग यांनी महापौर पदाची निवडणूक जिंकली आहे आणि विशेष म्हणजे उपमहापौर पदही भाजपने स्वत:कडे ठेवण्यात यश मिळवलं आहे.

या महापौर पदाच्या निवडणुकीत आम आदमी पार्टीने उमेदवार उतरण्यास आधी नकार दिला होता. त्यानंतर मग निवडणुकीवरच बहिष्कार टाकला, ज्यामुळे भाजपचा विजयाचा मार्ग अधिकच सोपा झाला होता.

Raja Iqbal Singh elected as Mayor of Delhi in the Triple Engine Government, marking a significant victory for BJP over Congress
Robert Vadra Statement : दहशतवादी हल्ल्याने देश संतापलेला असताना, रॉबर्ट वाड्रांचं वादग्रस्त विधान; म्हणाले ''देशात मुस्लिम...''

दिल्ली महापालिकेच्या महापौर निवडणुकीत भाजपला १३३ मतं मिळाली, तर काँग्रेसच्य वाट्याला केवळ आठ मतं आली. आम आदमी पार्टीने निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता, त्यामुळे भाजपने ही निवडणूक सहज जिंकली. त्यामुळे आता केंद्रात, दिल्लीत आणि एमसीडीमध्येही भाजपचीच सत्ता असणार आहे.

Raja Iqbal Singh elected as Mayor of Delhi in the Triple Engine Government, marking a significant victory for BJP over Congress
India-Pakistan Tensions : बुडत्याचा पाय खोलात! भारताने फास आवळताच भेदरलेल्या पाकिस्तानचा आत्मघातकी निर्णय!

दिल्ली महापालिकेत बहुतांश जागांवर भाजपचाच ताबा आहे. तर फेब्रुवारी २०२३ पासून नोव्हेंबर २०२४पर्यंत महापौर पद आम आदमी पार्टीकडेच होते आणि पक्षाच्या शैली ओबेरॉय महापौर होत्या.

भाजप नेते सरकार राजा इकबाल सिंग हे आतापर्यंत दिल्ली महापालिकेत विरोधी पक्षनेते पद सांभाळत होते. याआधी ते उत्तर दिल्ली महापालिकेचे महापौर देखील होते. त्याआधी सरदार राजा इकबाल सिंग हे अकाली दलात होते. मात्र कृषी कायद्याबाबत शिरोमणी अकाली दल आणि भाजपमध्ये वाढलेल्या अंतरानंतर ते भाजपमध्य गेले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com