Israel vs Hamas War : जगातल्या तब्बल २८ देशांना मान्य नाही इस्राईलचं अस्तित्व; काय आहे कारण ?

Israel vs Hamas War : पॅलेस्टाईनच्या भूमीत संघर्षाची बीजे...
Israel vs Hamas War
Israel vs Hamas WarSarkarnama
Published on
Updated on

Israel vs Hamas War : इस्राईल आणि हमास यांच्यात भीषण युद्ध सुरू आहे, ज्यामध्ये आतापर्यंत सुमारे अडीच हजार लोक मारले गेले आहेत. इस्राईलचा उल्लेख होताच जगातील बहुतांशी मुस्लिम देश आक्रमक होतात. याचे मूळ पॅलेस्टाइन आहे. पॅलेस्टाईनची जमीन बेकायदेशीरपणे इस्राईलच्या अमलाखाली आहे आणि ती मुक्त केल्याशिवाय शांतता नांदू शकत नाही, अशी मुस्लिम देशांची मानसिकता आहे.

पाकिस्तान, सीरिया, इजिप्त आणि लेबनॉनसारख्या अनेक देशांनी हमासच्या दहशती हल्ल्यांचं प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे समर्थन दिले आहे. इस्लामिक देश आणि इस्राईल यांच्यातील शत्रुत्व किती तीव्र आहे, जगातील २८ देशांनी इस्राईलला केलेल्या विरोधावरून स्पष्ट होते. (Latest Marathi News)

इस्राईल देशाची स्थापना 14 मे 1948 रोजी झाली आणि पुढच्याच वर्षी म्हणजे 1949 मध्ये हा देश संयुक्त राष्ट्र संघाचा सदस्य झाला. तरीही जगातील 193 पैकी 28 देश असे आहेत, जे इस्राईलला मान्यता देत नाहीत. या देशांमध्ये पाकिस्तान आणि बांगलादेश या भारताच्या शेजारी देशांचाही समावेश आहे. यापैकी 15 देश अरब प्रदेशात आहेत. ज्यामध्ये अल्जेरिया, कोमोरोस, जिबूती, इराक, कुवेत, लेबनॉन, लिबिया, मॉरिटानिया, ओमान, कतार, सौदी अरेबिया, सोमालिया, सीरिया, ट्युनिशिया आणि येमेन यांचा समावेश आहे.

आता जर आपण अरबव्यतिरिक्त देशांबद्दल बोललो तर त्यात अफगाणिस्तान, बांगलादेश, ब्रुनेई, इंडोनेशिया, इराण, मलेशिया, मालदीव, माली, नायजर आणि पाकिस्तान यांचा समावेश होतो. जे इस्राईलचं अस्तित्व मान्य करत नाहीत. एवढेच नाही तर इस्राईलला नाकारणाऱ्या देशांमध्ये क्युबा, उत्तर कोरिया आणि व्हेनेझुएला यांचाही समावेश आहे.

पाकिस्तान, बांगलादेश, ब्रुनेई, इराण आणि इराकमधील लोकांना इस्राईलमध्ये जाण्यास मनाई आहे. पाकिस्तानच्या पासपोर्टवर इस्राईल वगळता जगातील कोणत्याही देशात जाण्याची परवानगी आहे, असे नमूद केले आहे. पाकिस्तान आणि सौदी अरेबियासह 13 देश असे आहेत, जिथे इस्रायली नागरिकांना प्रवेश नाही.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com