Kangana Ranaut VS Subramanian Swamy : कंगना अन् भाजप खासदार सुब्रह्मण्यम स्वामींमध्ये ट्विटर वॉर; दोघांमध्ये जोरदार जुंपली...

Kangana Ranaut VS Subramanian Swamy Twitter War : "रामलीलाच्या शेवटच्या दिवशी कंगना यांना प्रमुख म्हणून निमंत्रित करणे हे मर्यादा पुरुषोत्तमांच्या कार्यक्रमाला शोभनीय नाही."
Kangana Ranaut VS Subramanian Swamy
Kangana Ranaut VS Subramanian SwamySarkarnama
Published on
Updated on

Kangana Ranaut VS Subramanian Swamy Twitter War : हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री कंगना राणावत आपल्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी असतात. अशातच आता कंगना यांचा 'तेजस' चित्रपट आजपासून प्रदर्शित झाला आहे. दरम्यान, कंगना राणावत आणि भाजपचे राज्यसभा खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांच्यात सोशल मीडियावर वाद सुरू झाला आहे. स्वामी यांनी कंगना यांच्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका फोटोवर कमेंट करून आपले मत व्यक्त केले, याचाच कंगना यांना राग अनावर झाला आणि दोघांमध्ये वाद सुरू झाला. (Latest Marathi News)

Kangana Ranaut VS Subramanian Swamy
Kangana Ranaut on INDIA : 'इंडिया' शब्दात आहे तरी काय ? कंगना रनौतचे ट्विट पुन्हा चर्चेत

स्वामींचा कंगनावर निशाणा -

विजयादशमीच्या मुहूर्तावर रावण दहनाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याने कंगना राणावत चर्चेत आहेत. कंगना यांच्या हस्ते रावण दहन झाल्यामुळे कंगनांवर टिप्पणी केली आहे. स्वामींनी ट्विट करत म्हटले की, "रामलीलाच्या शेवटच्या दिवशी कंगना यांना प्रमुख म्हणून निमंत्रित करणे हे मर्यादा पुरुषोत्तमांच्या कार्यक्रमाला शोभनीय नाही. हे फार चुकीचे आहे."

Kangana Ranaut VS Subramanian Swamy
NCP Thane News : शरद पवार गटातील 'त्या' पदाधिकाऱ्यांची परांजपेंनी नावे केली उघड; 'यांना माणसंही...'

कंगनांचा पलटवार -

कंगना राणावत यांनी सुब्रह्मण्यम स्वामींच्या ट्विटला सडेतोड उत्तर दिले आहे, 'स्वीमसूटमधील फोटो पाहून तुम्ही असे वक्तव्य कसे करू शकता? मी राजकारणात माझं स्थान बनवण्यासाठी मी हे सर्व केले आहे, असा आरोप कसे करता? मी एक कलाकार आहे, हिंदी चित्रपटांमधील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्री आहे," असे म्हणत कंगनाने पलटवार केला आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com