काँग्रेसला धक्का; माजी मुख्यमंत्र्यांच्या आमदार पुत्रासह दोघांचा भाजपमध्ये प्रवेश

पुढील वर्षी काही राज्यांमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे.
BJP, Congress
BJP, CongressFile Photo
Published on
Updated on

नवी दिल्ली : पुढील वर्षी काही राज्यांमध्ये विधानसभेची निवडणूक (Assembly Election) होणार आहे. काही महिन्यांवर आलेल्या या निवडणुकीआधी काँग्रेस (Congress) पंजाब, गोव्यापाठोपाठ आता मणिपूरमध्येही मोठा धक्का बसला आहे. माजी मुख्यमंत्र्यांच्या आमदार मुलासह दोन आमदारांनी सोमवारी भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला. काँग्रेससाठी हा मोठा झटका मानला जात आहे.

मणिपूरमध्ये (Manipur) सध्या भाजपची सत्ता आहे. पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीत बहुमत मिळवण्यासाठी भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. सोमवारी राजकुमार इमो सिंग आणि यामथाँग हाओकिप यांना पक्षात आणून भाजपने आघाडी घेतली आहे. सिंग हे मणिपूरमधील प्रसिध्द राजकीय कुटुंबातील आहेत. त्यांचे वडील राजकुमार जयचंद्र सिंग हे मणिपूरचे मुख्यमंत्री होते. तसेच राज्यातील पहिले केंद्रीय मंत्री म्हणूनही त्यांचा लौकिक आहे.

BJP, Congress
काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाला सीबीआयकडून अटक

केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल व मणिपूरचे प्रभारी संबित पात्रा यांच्या उपस्थितीत दोघांनी प्रवेश केला. सिंग हे काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आले होते. पण पक्षाविरोधात वक्तव्य केल्याने त्यांना निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी सोमवारी भाजपमध्ये प्रवेश केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खूप चांगले का केले आहे. देशातचा सन्मान वाढविणे, शांतता आणि स्थैर्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत, असे सिंग यावेळी म्हणाले.

सोनोवाल यांनी दोन्ही आमदारांचे स्वागत केले. ते म्हणाले, ईशान्येकडील राज्यांना त्यांचे स्वतंत्र ओळख निर्माण करून देण्यासाठी मोदी सरकार कटिबध्द आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्री, अधिकारी या भागातील समस्या सोडवण्यासाठी सतत येत असतात, असे सोनोवाल यांनी सांगितले. मणिपूरमध्ये भाजपने 2017 मध्ये पहिल्यांदाच सत्ता मिळवली आहे.

दरम्यान, रविवारी झालेल्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या राज्यांमध्ये मोठा विजय मिळवण्याचा ठराव करण्यात आला आहे. पक्षाची संघटनात्मक ताकद आणि विकासाच्या मुद्यावर ही निवडणूक लढवण्यात येणार आहे. भ्रष्टाचारमुक्त प्रशासन, पारदर्शकता आदी मुद्यांवर भर देण्यात येणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com