Uddhav Thackeray : आता पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घ्या, उद्धव ठाकरेंचे पंतप्रधान मोदींना आवाहन

Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने जम्मू-काश्मीरमधील निवडणुकीचा मार्ग मोकळा
Uddhav Thackeray
Uddhav Thackeraysarkarnama
Published on
Updated on

Uddhav thackeray on jammu and kashmir : जम्मू-काश्मीरमधील कलम सर्वोच्च न्यायालयात कलम 370 संदर्भात सोमवारी निकाल सुनावण्यात आला. या निकालात न्यायालयाने 370 कलम हटवण्याची प्रक्रिया अधिकृत ठरवून नरेंद्र मोदी सरकारला मोठा दिलासा दिला. तसेच पुढील वर्षी 30 सप्टेंबरपर्यंत तेथे निवडणूक घेण्याची सूचना केली. त्यावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेऊन संपूर्ण जम्मू-काश्मीरमध्ये निवडणूक घेण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केले आहे.

हिवाळी अधिवेशनासाठी उद्धव ठाकरे नागपूरमध्ये आहेत. सर्वोच्च न्यायालयाने कलम 370 हटवण्यासंदर्भात दिलेल्या निकालाचे ठाकरे यांनी स्वागत केले. जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा निर्णय घेतला होता. तेव्हा शिवसेना त्यांच्यासोबत उभी होती, याची आठवणही ठाकरे यांनी करून दिली.

Uddhav Thackeray
Supreme Court : कलम 370 हटविणे योग्यच; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या घटनापीठासमोर 370 कलम हटवण्यासंदर्भातील याचिकांवर सोमवारी निकाल सुनावण्यात आला. निकालात सरन्यायाधीशांनी स्पष्ट केले की, केंद्र सरकारच्या प्रत्येक निर्णयाला न्यायालयात कायदेशीर आव्हान देता येणार नाही. जम्मू-काश्मीर भारतात विलिन झाल्याने जम्मू-काश्मीर हे वेगळे विशेष दर्जा असलेले राज्य राहिलेले नाही.

जम्मू-काश्मीरमध्ये निवडणूक घेण्यापूर्वी विस्थापित झालेल्या काश्मिरी पंडितांना पुन्हा काश्मीरमध्ये आणले पाहिजे. मात्र, मोदी सगळ्याची गॅरेंटी घेतात. मग काश्मिरी पंडितांना आणण्याची गॅरंटी कधी घेणार? सध्या गॅरंटीचा काळ आहे, अशा टोलाही ठाकरे यांनी लगावला.

Uddhav Thackeray
Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये 30 सप्टेंबरपूर्वी निवडणूक घ्या; सर्वोच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला आदेश

2019 मध्ये गृहमंत्री अमित शाह यांनी जम्मू-काश्मीरला सार्वभौम दर्जा देणारे 370 कलम हटवण्याची घोषणा लोकसभेत केली होती. त्यावेळी शिवसेना एकसंध होती. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने या निर्णयाचे स्वागत केले होते. केंद्र सरकारमध्ये त्यावेळी शिवसेना सहभागी होती. त्यामुळे आपलाही या निर्णयात वाटा होता, असे शिवसेनेकडून सांगण्यात येत होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com