Eknath Shinde, Uddhav Thackeray News : शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्हावरुन केंद्रीय निवडणूक आयोगात (Central Election Commission) दोन्ही गटांना आपले लेखी म्हणणे सादर करण्यासाठी वेळ दिला होता. त्यानंतर ठाकरे गटाकडून ईमेलद्वारे लेखी उत्तर सादर करण्यात आले आहे. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडाविषयीची माहिती देण्यात आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने आपल्याला न्याय द्यावा, अशी विनंती या लेखी उत्तरात ठाकरे गटाने केली आहे.
ठाकरे गटाने दिलेल्या लेखी उत्तरात शिवसेना (Shivsena) पक्षातील बंडखोरी तारखेसह मांडली आहे. एकानाथ शिंदे यांनी नेमकी कशी बंडखोरी केली याबाबत माहिती देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. ठाकरे गटाने आतापर्यंतच्या सुनावणीमध्ये मांडले मुद्देच लेखी उत्तरातही मांडण्यात आले आहे.
शिंदे यांच्याकडे असणारे मुख्य नेतेपद हे घटनात्मक नाही, असा मुद्दा ठाकरे गटाने मांडला आहे. शिंदे यांना शिवसेनेची घटना यापूर्वी मान्य होती. मात्र, आताच नेमकं काय झालं? असा प्रश्न उपस्थित केला आहे.
शिंदे यांचे प्राथमिक सदस्यत्व रद्द करण्यात आले होते. त्यामुळे पक्ष आमचाच आहे, असा दावा करण्याचा अधिकार त्यांना नाही. त्यांना पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वातून रद्द करण्यात आले होते, असेही यामध्ये म्हटले आहे.
शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई (Anil Desai) यांनी या विषयी माध्यमांना माहिती दिली. त्यामध्ये ते म्हणाले, संपूर्ण घटनाक्रम हा 20 जून पासून सुरु झाला आहे. तेव्हापासून ते गेली सुनावणीपर्यंतच्या घटनाक्रमाविषयी माहिती सादर करण्यात आली आहे. या दरम्यान सर्वोच्च न्यायालयात काय युक्तिवाद करण्यात आला, याबाबतही म्हणणे मांडण्यात आले, असे देसाई यांनी सांगितले.
पक्ष हा वेगळा असतो. आमदार आणि खासदार हे पक्षाच्या तिकीटावर निवडून आलेले असतात. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी केलेल्या मेहनतीमुळे लोकप्रतिनिधी निवडून आले आहेत. त्यामुळे लोकप्रतिनिधी म्हणजेच पक्ष हे म्हणता येणार नाही, अशी भूमिका ठाकरे गटाने घेतली आहे, असे देसाई यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.