Ukraine Russia War : युद्धविरामानंतरही रशियाने आमच्यावर हल्ले केले : युक्रेनने लावले आरोप!

Ukraine Russia War : ख्रिसमसपर्यंत युक्रेनमधून आपले सैन्य मागे घेण्यास सुरुवात केली पाहिजे.
Ukraine Russia War | Putin | zelenskiy
Ukraine Russia War | Putin | zelenskiySarkarnama

Ukraine Russia War : रशिया आणि युक्रेनमध्ये जवळपास 10 महिन्यांपासून युद्ध सुरू आहे. दरम्यान काल (दि.५ जाने) गुरुवारी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी 36 तासांच्या युद्धबंदीची घोषणा केली. याबाबत आता युक्रेनने मोठा दावा केला आहे. खरे तर रशियाने युद्धविरामाचे उल्लंघन करून पूर्वेकडील शहरावर हल्ला केल्याचे युक्रेनकडून सांगण्यात आले. मात्र युक्रेनचे हे आरोप रशियाने फेटाळले आहेत. रशिया युद्धबंदी घोषणेचा आदर करतो, पण तरीही युक्रेनेच गोळीबार केल्याचा उलट आरोप रशियाने केला आहे.

पुतिन यांनी ऑर्थोडॉक्स ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर 36 तासांच्या युद्धबंदीची घोषणा केली होती. रशियन ऑर्थोडॉक्स चर्चच्या प्रमुखांनी पुतीन यांना यासंदर्भात आवाहन केले. मात्र, युक्रेनने पुतीन यांचे हे पाऊल फसवे असल्याचे आधीच नाकारले आहे. आदेश जारी करताना, क्रेमलिनने सांगण्यात आले की, पुतिन यांनी 36 तासांच्या युद्धविरामाचे आदेश दिले आहेत. हा युद्धविराम 6 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजता सुरू होईल. रशिया आणि युक्रेनच्या अनेक नागरिकांसहऑर्थोडॉक्स ख्रिश्चन 6 व 7 जानेवारी रोजी ख्रिसमस साजरा करतात.

Ukraine Russia War | Putin | zelenskiy
Baramati News : रघुनाथदादा, आपल्या पिढीतील किती सोबती आता उरले आहेत? : पवारांचा भावनिक सवाल

विशेष म्हणजे 24 फेब्रुवारीला रशियाने आपल्या शेजारील देश युक्रेनवर हल्ला केला होता. गेल्या जवळपास 10 महिन्यांत या युद्धात हजारो लोक मारले गेले आणि लाखो लोक विस्थापित झाले. हे युद्ध संपवण्यासाठी रशिया आणि युक्रेन सध्या कोणत्याही प्रकारची चर्चा करताना दिसून येत नाहीत.

Ukraine Russia War | Putin | zelenskiy
Chitra Wagh : मैत्रिणीने दिलेल्या नोटिशीवर चित्रा वाघ म्हणाल्या; आतापर्यंत 56 आल्या, त्यात एक भर!

युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी अलीकडेच म्हटले होते की, रशियाने दुसऱ्या महायुद्धानंतर युरोपमधील सर्वात मोठा संघर्ष संपवण्यासाठी पाऊल उचलले पाहिजे आणि ख्रिसमसपर्यंत युक्रेनमधून आपले सैन्य मागे घेण्यास सुरुवात केली पाहिजे. रशियाने झेलेन्स्कीचे सैन्य मागे घेण्याचे आवाहन नाकारले आणि कीव या भागाला नवा प्रदेश अशी ओळख स्विकारण्यास सांगितले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com