कृषी कायदे पुन्हा आणले जाऊ शकतात! केंद्रीय कृषीमंत्र्यांनीच दिले संकेत

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी देशाची माफी मागत कृषी कायदे (Farm Laws) मागे घेतल्याचे जाहीर केले होते.
Narendra Singh Tomar
Narendra Singh TomarSarkarnama
Published on
Updated on

नागपूर : मागील वर्षभरापासून तीन कृषी कायद्यांविरोधात (Farm Laws) शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी माफी मागत हे कायदे मागे घेतल्याचे जाहीर केले होते. आता केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर (Narendra Singh Tomar) यांनी या प्रकरणी मोठा बॉम्ब टाकला आहे. कृषी कायदे पुन्हा आणले जाऊ शकतात, असे संकेत त्यांनी दिले आहेत.

नागपूरमध्ये एका कार्यक्रमात बोलताना तोमर म्हणाले की, काही लोकांनी कृषी कायद्यांना काळे म्हटले. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तब्बल 70 वर्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली झालेल्या सुधारणा काही जणांना आवडल्या नाहीत. परंतु, सरकार निराश झालेले नाही. आम्ही एक पाऊल मागे हटलो असलो तरी पुन्हा आम्ही पुढे पाऊल टाकणार आहोत. कारण शेतकरी हे देशाचा कणा आहेत.

Narendra Singh Tomar
ममतांना गोव्याचं गणित जमेना! निवडणुकीआधी पाच नेत्यांचा तडकाफडकी राजीनामा

कृषी कायदे आणि त्यामुळे शेतकरी आंदोलन भाजपला चांगलेच महागात पडल्याचे चित्र आहे. भाजपने या प्रकरणी वर्षभरानंतर सपशेल शरणागती पत्करत तिन्ही कृषी कायदे मागे घेतले . तरीही शेतकरी माघार घेण्यास तयार नव्हते. शेतकऱ्यांनी हमीभाव कायद्याची मागणी लावून धरली होती. याचबरोबर आंदोलनादरम्यान मृत्यूमुखी पडलेल्या 700 शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाईची मागणी करण्यात आली आहे. शेतकरी मागे हटण्यास तयार नसल्याने मोदी सरकारची कोंडी झाली होती. अखेर सरकारने आश्वासन देऊन समिती स्थापन केल्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले.

Narendra Singh Tomar
राहुल गांधींना भेटला अन् बडा नेता म्हणाला, मीच नेतृत्व करणार पण मुख्यमंत्रिपदाचं नंतर बघू!

देशवासियांशी संवाद साधताना पंतप्रधान मोदींनी 19 नोव्हेंबरला कृषी कायदे मागे घेण्याची मोठी घोषणा केली. या वेळी बोलताना मोदी म्हणाले होते की, मी आज देशवासियांची क्षमा मागत सत्य आणि पवित्र मनाने सांगू इच्छितो की, बहुतेक आमच्या तपस्येतच काही कमी राहिली असेल. दिव्याच्या प्रकाशाएवढे सत्य काही शेतकऱ्यांना समजावू शकलो नाही. आज गुरूनाक देवजींचे पवित्र प्रकाशपर्व आहे. ही वेळ कुणालाही दोष देण्याची नाही. मी पूर्ण देशाला सांगायला आलो आहे की, आम्ही तिन्ही कृषी कायद्यांना परत घेण्याचा निर्णय घेतला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com