Delhi Coaching Center Incident : दिल्ली कोचिंग सेंटर दुर्घटनेबाबत मोदी सरकार 'Action Mode' वर ; गृह मंत्रालयाने उचलले मोठे पाऊल!

Delhi Old Rajinder Nagar Incident : या घटनेवर सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जात असताना स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनीही दिल्लीत सरकारविरोधात निदर्शनं केली आहेत. तर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देखील सरकारवर टीका केली आहे.
Delhi Coaching Center Incident
Delhi Coaching Center IncidentSarakarnama
Published on
Updated on

MHA On Delhi Coaching Center Incident : दिल्ली कोचिंग सेंटरमध्ये झालेल्या दुर्घटनेवरून मोदी सरकार आता 'Action Mode'वर आले आहे. केंद्र सरकारने राजेंद्र नगर स्थित राउज आयएएस कोचिंग सेंटरच्या तळघरात घडलेल्या दुर्घटनेच्या चौकशीसाठी एक समिती गठीत केली आहे. आता ही समिती या दुर्घटनेसाठी नेमकं कोण जबाबदार आहे, याचा शोध घेणार आहे. यासंबंधी गृहमंत्रालयाने आदेशही जारी केला आहे.

केंद्रीय गृहमंत्रालयाच्यावतीने एक्सवर एका पोस्टद्वारे समिती गठीत करण्यात आल्याबाबतची माहिती दिली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने दिल्ली कोचिंग दुर्घटनेच्या तपासासाठी एक समिती गठीत केली आहे. ही समिती दुर्घटनेहीच्या कारणांचा तपास करेल आणि जबाबदारीही निश्चित करेल. याशिवाय समिती यावर उपायही सूचवेल आणि काही धोरणात्मक बदलांची आवश्यकता असल्यास तशी शिफारसही करणार आहे.

Delhi Coaching Center Incident
Rahul Gandhi : दिल्लीतील घटनेवर राहुल गांधी संतापले; सरकारच्या बेफिकिरीला फटकारले

समितीमध्ये कोण कोण आहे सहभागी ? -

गृहमंत्रालयाकडून गठीत समितीमध्ये अतिरिक्त सचिव, दिल्ली सरकारचे गृह विभागाचे प्रमुख सचिव, दिल्ली पोलिसांचे विशेष आयुक्त, फायर अ‍ॅडव्हाझर, केंद्रीय गृहमंत्रालयाचे संयुक्त सचिव यासह अनेक प्रमुख अधिकाऱ्यांचा समावेश असणार आहे. ही समिती 30 दिवसांच्या आत प्रकरणाचा तपास अहवाल सादर करणार आहे.

उपराज्यपालांनी मदतीची केली घोषणा -

याप्रकरणी दिल्लीचे उपराज्यपाल व्ही. के. सक्सेना(V. K. Saxena) यांनी मृतांच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. याआधी एमसीडीने अनेक कोचिंग सेंटर्सच्या विरोधात कारवाई केली आहे. दिल्ली पोलिसांनी आरोपींना अटक केली. ओल्ड राजेंद्र नगर येथील आयएएस कोचिंग सेंटरच्या तळघरात शनिवारी रात्री पावसाचं पाणी भरलं होतं, ज्यामुळे तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला, हे प्रकरण संसदेतही गाजलं आहे.

Delhi Coaching Center Incident
Vishal Patil : पत्नी चित्रपटाला घेऊन गेली अन्..! विशाल पाटलांचं लोकसभेत तडाखेबंद भाषण

 दिल्लीतील मुसळधार पावसामुळे IASच्या अभ्यास करणाऱ्या तीन युवकांचा तळघरातील पाण्यात अडकल्याने मृत्यू झाला. या घटनेवर संताप व्यक्त केला जात असताना स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी दिल्लीत सरकारविरोधात निदर्शनं केली. विरोधी पक्षनेते राहुल गांधी(Rahul Gandhi) यांची देखील यावरून सरकारवर टीका केली आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com