पडद्यामागं काय घडलं : केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला कशी झाली अटक?

अखेर केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याला अटक झाली आहे. त्याच्या अटकेमागील घडामोडी आता समोर येऊ लागल्या आहेत.
Ashish Mishra
Ashish Mishra
Published on
Updated on

लखीमपूर खीरी : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) लखीमपूर खीरी (Lakhimpur Kheri) येथे घडलेल्या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेला सहा दिवस झाल्यानंतर अखेर केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा (Ajay Mishra) यांचा मुलगा आशिष मिश्रा (Ashish Mishra) याला अटक झाली आहे. तो काल उत्तर प्रदेश पोलिसांसमोर (Uttar Pradesh Police) चौकशीसाठी हजर झाला होता. त्याच्या अटकेमागील घडामोडी आता समोर येऊ लागल्या आहेत.

लखीमपूर खीरीतील गुन्हे शाखेच्या कार्यालयात आशिष हा काल चौकशीसाठी हजर झाला. कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी असल्याने पोलिसांनी त्याला मागील दाराने आतमध्ये घेतले. या घटनेच्या चौकशीसाठी विशेष तपास पथकाने (एसआयटी) आशिष याची चौकशी केली. पोलीस उपमहानिरीक्षक उपेंद्र अगरवाल यांच्या नेतृत्वाखाली ही 9 सदस्यीय एसआयटीने ही चौकशी केली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान आशिषने घटना घडली त्यावेळी घटनस्थळापासून 4 ते 5 किलोमीटर अंतरावरील कुस्तीच्या कार्यक्रमात असल्याचे सांगितले. परंतु, त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी बंदोबस्ताला असलेले पोलीस आणि इतर व्यक्तींनी वस्तुस्थिती समोर आणली. आशिष हा 2 ते 4 या वेळेत कार्यक्रमस्थळी नव्हता. याबद्दल विचारणा केली असता त्याला समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत. आशिषच्या मोबाईलची टॉवर लोकेशन घटनास्थळावरील दाखवत होती. याबद्दल त्याला विचारले असते त्याने घटनास्थळापासून जवळ असलेल्या राईस मिलमध्ये असल्याचे सांगितले.

Ashish Mishra
मोठी बातमी : मुंबई पोलिसांनी थेट सीबीआय संचालकांनाच बजावले समन्स

आशिष मिश्रा याच्या गाडीचा ड्रायव्हर हरी ओमने शेतकऱ्यांविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीत ड्रायव्हर हरी ओमने तो गाडी चालवत असल्याचे म्हटले होते. हरी ओमने त्यावेळी पिवळा कुर्ता घातला होता. परंतु, घटनेच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओत पांढरा शर्ट घातलेला व्यक्ती गाडी चालवताना दिसत आहे. यावर आशिषला उत्तर देता आले नाही. नंतर त्याने उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरवात केली. तसेच, काही प्रश्नांची उत्तरे देणे टाळले. त्यामुळे पोलिसांनी त्याला अखेर अटक केली, असे सूत्रांनी सांगितले.

Ashish Mishra
मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने थेट परमबीरसिंहांच्या घरावरच चिकटवली नोटीस

मंत्र्याच्या मुलाला अद्याप अटक न झाल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयानेही तीव्र नाराजी व्यक्त केली होती. यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी पुन्हा आधीचाच पाढा गिरवला होता. केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रांच्या लखीमपूर खीरीतील घरावर पोलिसांनी पुन्हा नोटीस चिकटवली. त्यांचा मुलगा आशिष मिश्रा याने चौकशीसाठी हजर राहावे, अशी ही नोटीस होती. दरम्यान, एक दिवस आधीही सर्वोच्च न्यायालयाने या मुद्द्यावर उत्तर प्रदेश सरकारला झापले होते. त्यामुळे त्यादिवशीही पोलिसांनी मिश्रांच्या घरावर नोटीस चिकटवली होती. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी लव कुश आणि आशिष पांडे या दोघांनी अटक करण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com