नवी दिल्ली : जातीनिहाय जनगणनेला भाजपचा (BJP) विरोध नाही, पण अशा जनगणनेच्या आडून अवैध बांगलादेशी व रोहिंग्यांना फायदा होऊ नये, अशी भूमिका भाजपने आता घेतली आहे. या घुसखोरांना जातीनिहाय जनगणनेतून बाहेर ठेवावे पण देशातील, विशेषतः मागासवर्गीयांचे लाभ घेणाऱया मुस्लिमांना वगळू नये, अशी मागणी केंद्रीय मंत्री व ज्येष्ठ भाजप नेते गिरीरीजसिंह (Giriraj Singh) यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार (Nitish Kumar) यांच्याकडे केली आहे. (BJP on Caste based Census)
जातीनिहाय जनगणनेला भाजपने पाठिंबा दिलेला नाही. पण बिहारमध्ये एकत्र सत्तेत असल्यामुळं मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या आग्रहासमोर भाजपनं मौन धारण केलं आहे. त्यामुळे जनगणनेवर भाजपने आता घुसखोरांचा मुद्दा उपस्थित केला. जातीनिहाय जनगणनेचे काम बिहारमध्ये नोव्हेंबर महिन्यापासून सुरू करण्याचा नितीशकुमार यांचा विचार आहे. विरोधी पक्षनेते व राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्यासह विरोधी पक्षांनही याला पाठिंबा दिलेला आहे.
जातीनिहाय जनगणनेवर गिरीराजसिंह यांनी भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, बिहारमध्ये जातीनिहाय जनगणनेला आमचा विरोध नाही. परंतु, यातून रोहिंग्या व बांगलादेशी घुसखोरांना वगळावे. १९९० मधील आकडेवारीनुसार बिहारच्या ११ जिल्हयांत चार लाख घुसखोर राहात होते. आता ही संख्या वाढली असण्याची चिन्हे आहेत. लांगुलचालनाच्या राजकारणात या सर्वांची जनगणना केल्यास त्याला काहीच अर्थ उरणार नाही. या घुसखोरांना देशाचे नागरिक म्हणून मान्यता देणे धोक्याचा इशारा देणारे ठरेल.
बांगलादेशी, रोहिंगे हे भारतात घुसखोर होते व आहेत. त्यांना देशातील कोणत्याही योजनेत सहभागी करून घेऊ नये. बिहारचे अथवा भारतीय नागरिक असलेल्या मुस्लिमांना या जनगणनेत सामील करावे. विशेषतः मागासवर्गीयांचे लाभ मिळवणाऱया मुस्लिमांची जनगणना व्हायला हवी. त्यांना यातून वगळू नये कारण हे मागासवर्गीय मुस्लिम आरक्षणाचेही फायदे घेतात, असेही त्यांनी स्पष्ट केलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.