नवी दिल्ली : उत्तर प्रदेशात पहिल्या टप्प्यासाठी (UP Election 2022) आज मतदान होत आहे. पश्चिम उत्तर प्रदेशातील 11 जिल्ह्यांतील 58 जागांवर मतदान होत आहे. पहिल्या टप्यात ६२३ उमेदवाराचे भवितव्य आज मतपेटीत बंद होत आहेत. यात योगी सरकारचे Yogi Adityanath)अर्धा डझन मंत्री अन् भाजप नेत्यांच्या वारसदारांचा समावेश आहे.
पहिल्या टप्यात योगी सरकारमधील मंत्र्यांमध्ये मथुरा येथून श्रीकांत शर्मा, गाजियाबाद येथून अतुल गर्ग, थाना भवन येथून सुरेश राणा, मुज्जफ्फर नगर येथून कपिलदेव अग्रवाल, अतरौली येथून संदीप सिंह यांचे भवितव्य आज मतपेटीत बंद होणार आहे. (UP Election Voting Updates)
तर दुसरीकडे पहिल्या टप्याच्या निवडणुकीत माजी मु्ख्यमंत्री कल्याण सिंह यांचे नातू संदीप सिंह हे अलिगड जिल्ह्यातील अतरैाली विधानसभेसाठी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. ते दुसऱ्यांदा निवडणूक लढवित आहेत. संदीप सिंह हे एटाचे विद्यमान खासदार राजवीर सिंह यांचे पुत्र आहेत. २०१७ मध्ये पहिल्यांदा अतरैाली विधानसभा मतदार संघातून विजयी होऊन आमदार अन् मंत्री झाले आहेत. पुन्हा एकदा ते याच मतदारसंघातून नशीब अजमावत आहेत.
संदीप सिंह यांच्याविरोधात समाजवादी पार्टीने वीरेश यादव, बसपाचे ओमवीर सिंह यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. तर कॉग्रेसचे धर्मेंद कुमारही अतरैाली मतदार संघातून निवडणूक लढवत आहेत. समाजवादी पार्टीला आरएलडीचा पाठिंबा आहे.
उत्तरप्रदेशाचे माजी मुख्यमंत्री, विद्यमान संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे पुत्र पंकज सिंह हे नोएडा मतदार संघातून दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. पंकज सिंह यांच्या विरोधात समाजवादी पार्टीचे सुनील चैाधरी हे लढत देत आहेत. कॉग्रेसने पंखुडी पाठक तर बहुजन समाज पार्टीचे कृपाराम शर्मा हे मैदानात आहेत. पंकज सिंह हे २०१७ मध्ये याच नोएडा मतदार संघातून विजयी झाले आहेत.
शामली जिल्ह्यातून कैराना विधानसभा मतदार संघात राजकीय वारसदारांमध्ये लढत होत आहे. समाजवादी पार्टीचे विद्यमान आमदार नाहिद हसन है मैदानात आहेत, त्यांचे वडील मुन्नव्वर हसन, आई तबस्सुम हसन हे खासदार म्हणून निवडणूक आलेले आहेत. याठिकाणी भाजपने मृगांका सिंह यांना मैदानात उतरवलं आहे. त्या या माजी खासदार हुकुम सिंह यांच्या कन्या आहेत. त्यांचा दोन वेळा या मतदार संघातून पराभव झाला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.