मोदींच्याच मतदारसंघात ईव्हीएमबाबत झालेल्या चुकीची आयुक्तांनीच दिली कबुली

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक निकालांसाठी काही तासांचा अवधी असतानाच एव्हीएम मिशनवरून जोरदार राजकारण सुरू झालं आहे.
UP Election 2022
UP Election 2022Sarkarnama

वाराणसी : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक (UP Election 2022) निकालांसाठी काही तासांचा अवधी असतानाच एव्हीएम मशिनवरून (EVM Machine) जोरदार राजकारण सुरू झालं आहे. ईव्हीएम मशिनच्या सुरक्षेवरून मोठा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या वाराणसीमध्येच हा प्रकार घडल्याने समाजवादी पक्षानं रान उठवलं आहे. त्यातच वाराणसीच्या (Varanasi) आयुक्तांनीच प्रोटोकॉलमध्ये त्रुटी राहिल्याची कबुली दिल्यानं खळबळ उडाली आहे.

देशातील पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचा निकाल गुरूवारी (ता. 9) रोजी जाहीर होणार आहे. संपूर्ण देशाच्या नजरा प्रामुख्याने उत्तर प्रदेशाच्या (Uttar Pradesh) निकालाकडे लागल्या आहे. एक्झिट पोलमध्ये भाजपच्या (BJP) जागा कमी होणार असल्या तरी पुन्हा सत्ता मिळणार असल्याचे दिसत आहे. पण समाजवादी पक्षाने हे एक्झिट पोल फेटाळून लावले आहेत. भाजपकडून ईव्हीएममध्ये छेडछाड केली जाऊ शकते असा आरोप करत सपाचे नेते, कार्यकर्ते ईव्हीएम मशिन ठेवलेल्या ठिकाणी रात्रंदिवस पहारा देत आहेत.

UP Election 2022
निकाल लागला! निवडणुकीत काँग्रेसची धूळधाण; भाजपचा एकहाती विजय

त्यातच वाराणसीमध्ये ईव्हीएम मशिनच्या प्रोटोकॉलमध्ये त्रुटी आढळून आल्या आहेत. वाराणसी मंडलचे आयुक्त दीपक अग्रवाल यांनी माध्यमांशी बोलताना ही कबुली दिली आहे. सपाने त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल केला आहे. त्यानंतर सपाच्या कार्यकर्त्यांनी वाराणसीच्या अनेक भागात रस्त्यावर उतरून जोरदार आंदोलन केलं.

मंगळवारी रात्री सपाच्या कार्यकर्त्यांनी ईव्हीएम मशिन ठेवलेली गाडी अडवली होती. वाराणीतील पहडिया मंडी येथील अन्नधान्य गोडाऊनमधून काही ईव्हीएम मशिन एका गाडीतून यूपी कॉलेजमध्ये नेल्या जात होत्या. मशिन बदलण्यात आल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केल्यानंतर जोरदार वाद निर्माण झाला. जिल्हाधिकारी कौशल राज शर्मा यांनी या मशनि प्रशिक्षणासाठी वापरल्या जाणार असल्याचा खुलासा केला आहे.

अग्रवाल यांनी सांगितलं की, मतदानासाठी वापरण्यात आलेल्या ईव्हीएम मशिन हलवताना प्रोटोकॉलमध्ये त्रुटी आढळून आली आहे. याचा अहवालही पाठवणार आहोत. पण ईव्हीएममध्ये छेडछाड झालेली नाही, हे मी ठामपणे सांगू शकतो. कारण मशिन ठेवण्यात आलेल्या स्ट्राँग रूमला तीन स्तरीय सुरक्षा व्यवस्था असते. अडवलेल्या गाडीमध्ये असलेल्या मशिन आणि मतदानासाठीच्या मशिन वेगळ्या आहेत. जर त्या एकच निघाल्या तर आम्ही दोषी असल्याचे मान्य करू.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com