आसाम : आसाम (Assam) नगरपालिका निवडणुकीत (Local Body Election Result) काँग्रेस (Congress) पक्षाची अक्षरशः धूळधाण झाली आहे. ९७७ वॉर्डांपैकी ५४८ वॉर्डांमध्ये भाजपने (BJP) आघाडी घेतली आहे. तर काँग्रेसला केवळ ६१ जागांवर आघाडी घेण्यात यश मिळालं आहे. तर इतर आणि अपक्ष जवळपास १२५ जागांवर आघाडी आहेत. रविवार (६ मार्च) ला यासाठी मतदान झाले होते.
आसाम राज्य निवडणूक आयोगाने (Assam State Election Commission) दिलेल्या आकडेवारीनुसार, एकूण ८० नगरपालिकांच्या ९७७ वॉर्डंसाठी हि निवडणूक पार पडली होती. यात ९७७ पैकी तब्बल ५४८ जागांवर भाजप आघाडीवर आहे. तर काँग्रेसला केवळ ६१ जागांवर आघाडी घेण्यात यश मिळालं आहे. इतर आणि अपक्ष असे मिळून जवळपास १२५ जागांवर आघाडी आहेत. यापूर्वीच ५७ वॉर्डंमध्ये बिनविरोध निवडणूक पार पडली आहे.
आज सकाळी मतमोजणी सुरु झाल्यापासूनच भाजपने मोठी आघाडी घेतली होती. सकाळी ९ वाजताच भाजपने २९६ वॉर्डमध्ये आघाडी घेत विजयी वाटलासीला सुरुवात केली होती. त्यावेळी काँग्रेस केवळ ३३ वॉर्डंमध्ये आघाडीवर होता. तर अन्य ६२ जागांवर आघाडीवर होते. आसाममधील या नगरपालिका निवडणुकांचे वैशिष्ट्य म्हणजे, इतिहासात पहिल्यांदाच आसाममध्ये स्थानिक निवडणुकांमध्ये देखील ईव्हीएम वापरण्यात आले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.